Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

महिला आयोगाचा अध्यक्ष सौ. रुपालीताई चाकणकरांनी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात नेमल्या महिला निरीक्षक...



राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी पावले टाकली आहेत. त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महिला निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसाहेब यांनीही चाकणकरांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. यातून पक्षाची तालुका पातळीवरील अचूक माहिती आपल्याला मिळू शकेल, असे जयंत पाटीलसाहेब म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसाहेब आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष  रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी अमरावती विभागातील महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक प्रदेश कार्यालयात घेण्यात आली. यावेळी माजी आमदार विद्याताई चव्हाण, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. आशा मिरगे, अमरावती विभाग महिला निरीक्षक वर्षा निकम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांमधील तालुकावार महिला निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली.
पक्ष संघटना वाढवणे, पक्षाचे कार्यक्रम तळागाळात रुजवणे तसेच नागरी सुविधेची कामे सुरळीतपणे होण्याकरता, कार्यकर्ते आणि जिल्हाध्यक्ष यांच्यातील संवादाचा दुवा बनण्याचे काम हे निरीक्षक करतील, अशी अपेक्षा रूपालीताई चाकणकर यांनी नियुक्तीपत्र देताना व्यक्त केली.
या आढावा बैठकीत बोलताना जयंत पाटीलसाहेब म्हणाले, स्थानिक पातळीवर पक्ष संघटना बळकट होण्यासाठी युवक आणि महिला फ्रंटल अधिक आक्रमक असणे गरजेचे आहे. यातूनच विभागात पक्षाचा प्रभाव वाढतो. स्थानिक पातळीवर प्रभावीपणे काम करणाऱ्या महिलांना पक्षाने योग्य न्याय द्यायला हवा. 2024 च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महिलांनी संघटनेच्या कामाला लागावे, असे आवाहन जयंत पाटीलसाहेब यांनी यावेळी केले.
पक्षाच्या स्थानिक कार्यकारिणीकडून वेळोवेळी अहवाल मागवला जातो. यासाठी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी तालुका निरिक्षक नेमण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे, असे जयंत पाटीलसाहेब यांनी सांगितले. यातून पक्षाची तालुका पातळीवरील अचूक माहिती आपल्याला मिळू शकेल. या उपक्रमातून राज्यातील प्रत्येक तालुक्यात आपण पोहचू आणि पक्षसंघटनेसाठी ही गोष्ट अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास जयंत पाटीलसाहेब यांनी व्यक्त केला.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध