Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

शहरातील सराफ बाजारात असलेल्या अरिहंत ज्वेलर्स या ठिकाणी ग्राहक बनून आलेल्या चौघांनी भरदिवसा सुमारे सव्वादोन लाखांचे दागिने लांबविले



धुळे प्रतिनिधी:शहरातील सराफ बाजारात असलेल्या अरिहंत ज्वेलर्स या ठिकाणी ग्राहक बनून आलेल्या चौघांनी भरदिवसा सुमारे सव्वादोन लाखांचे दागिने लांबविले. या चार जणांच्या टोळीत एक पुरुष तर तीन महिला होत्या. घटनेबद्दल धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे याच अरिहंत ज्वेलर्स दुकानात ७ वर्षांपूर्वीही चोरी झाली होती.सराफ बाजारातील अरिहंत ज्वेलर्स या ठिकाणी नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होता.या वेळी एक पुरुष व तीन महिला या ग्राहक बनून आले.सुरुवातीला त्यांनी सोन्याचा नेकलेस व नंतर मंगलपोत पाहावयास घेतली.चौघांवर विश्वास ठेवून त्यांना नेकलेस व मंगलपोत दाखवण्यात आली.यानंतर हातचालाखीने चौघांनी नेकलेस व मंगलपोत लांबवली.यानंतर चौघे ही पसार झाले.सायंकाळी व्यवहार बंद करताना हा प्रकार समोर आला . यानंतर सीसीटीव्ही पडताळल्यावर दुकानात आलेल्या चौघांचा प्रताप समोर आला. दुपारी १२ वाजून ७ मिनीटे ते १२ वाजून २२ मिनीटे या काळात ही चोरी झाली. 


चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत दोन लाख २५ हजार ९ ०० रुपये एवढी आहे . या प्रकरणी दुकानातील मॅनेजर संजय शांतीलाल खिवसरा ( वय ५१ ) यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चौघा चोरटया विरुध्द धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीसीटिव्ही फुटेजचा आधार घेवू शोध सुरू झाला आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध