Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

साक्रीतील भाजपाचे निरपराध कार्यकर्त्यांची नावे खोट्या गुन्हातुन वगळण्याची विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. प्रविण दरेकर यांची मागणी



धुळे : साक्री नगर पंचायतीच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीला निर्विवाद बहुमत मिळाल्याने सत्ताधारी आघाडीचा दारुण पराभव झाला. याचा राजकीय वचपा काढण्यासाठी सुडबुध्दीने भाजपाचे ५ ते ६ कार्यकर्त्यांविरुद्ध साक्री पोलिसात खोटया खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. भाजपाचे निरपराध कार्यकर्त्यांची नावे वगळण्यात यावी अशी मागणी जिल्हा दौर्‍यावर असलेले राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते मा. ना. श्री. प्रविणजी दरेकर यांनी केली आहे. यावेळी केंद्रीय माजी राज्यमंत्री खा. डाॅ. सुभाष भामरे, खा. डाॅ. हिना गावित, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा, धुळे जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, महानगरध्यक्ष अनुप अग्रवाल इतर मान्यवर उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध