Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

विनापरवानगी गावाच्या सरपंच यांनीच केली जिवंत झाडांची कत्तल..! सरपंच व सदस्य ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करा..!बौद्ध समाजाची मागणी..!



धुळे प्रतिनिधी - प्रतिनिधि ग्रामपंचायत विरदेल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर मधे बौद्ध समाजाची स्मशान भुमि गेल्या 100 वर्ष पासुन अस्तित्वात आहे तिथे समाजबांधव यांनी 60/70
निंबाची झाडे लावुन आज तागायत त्यांची जतन हा समाज करत आहे सरपंच पती सतिष गोटू बेहेरे त्यांचे बंधू शामकांत बेहेरे,ग्रामसेवक,

व सर्व सदस्य यांनी संगन मताने कोणताही ही ग्रामपंचायत ठराव न करता कोणत्याही यत्रनेची परवानगी न घेता मनमानी कारभार करुन तब्बल 8 झाड़े जमिनदोस्त केली आहेत समाजाची लोक बोलयाला गेले असता त्यांना अरेरावी करत तुमच्या ने जे होईल ते आमचे करुन घ्या..आम्ही सत्ताधारी आहोत आम्हाला जिथे पटेल तिथे आम्ही काम करु.आसा सत्तेचा माज असलेल्या सत्ताधारींना महाराष्ट्र वृक्ष संरक्षण आणि सवर्धंन नियम 2009 अधिसूचना मधिल कलम 21 (1)व 2 नुसार विनापरवानगी वृक्षतोड कारणरयवार अदखल पात्र गुन्हा नोदवा..अन्यथा जिल्हा स्तरावर जनआदोलंन करण्यात येईल यास सर्वस्व जबाबदार संबधीत यत्रणा व प्रशासन राहील अशी मागणी शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांच्या कडे सर्व समाजबांधव विरदेल यांनी आज रोजी निवेदन देऊन केली..

तरुण गर्जना वृत्तपत्र सह 
सचिन वाफेकर धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध