Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, ३० जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
माजी जि.प.सदस्य ओंकार आबा जाधव हे तालुक्यातील शेतकरी,कष्टकरी, कामगार,व्यापारी व सामान्य माणसाकरिता स्वतःचा वाढदिवस साजरा न करता दि.१ फेब्रुवारीला तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसणार! .
माजी जि.प.सदस्य ओंकार आबा जाधव हे तालुक्यातील शेतकरी,कष्टकरी, कामगार,व्यापारी व सामान्य माणसाकरिता स्वतःचा वाढदिवस साजरा न करता दि.१ फेब्रुवारीला तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसणार! .
शिरपुर (प्रतिनिधी):-शिरपुर तालुक्यातील लढाऊ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य ओंकार आबा जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सन २०११ पासून तालुक्यातील दहिवद शिवाजीनगर सरकारी साखर कारखाना तसेच सह.सुतगिरणी व सहकारी दुध संघ बंद अवस्थेत आहेत त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी,कष्टकरी,कर्मचारी , व्यापारी व तालुक्यातील तमाम जनतेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे व सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण ही वाढलेले आहे.
तरी वरील कृषी पुरक उद्योग सुरु झाल्यास तालुक्यातील आर्थिक व्यवस्था सुधारेल व शेतकरी सुखी होईल.तसेच महावितरणाकडून देण्यात येणाऱ्या बिलाचे आकारणी संबंधी विवरण व स्पष्टीकरण जनतेसमोर देण्यात यावे.त्याचबरोबर सावळदे तापी पुलावरुन आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
त्याकरिता तापी नदीवरील सावळदे व गिधाडे पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण जाळी तात्काळ बसवण्यात यावी . त्याचप्रमाणे शिरपूर नगरपालिकेत पाणीपट्टी बिलाची आकारणी प्रमाणापेक्षा जास्त होत असल्याने जनतेला अधिक भार होतो,म्हणुन केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे पाण्यावरील बिल कमीत कमी आकारण्यात यावे.तसेच काही सहकारी आर्थिक संस्थांमधील गंभीर भ्रष्टाचार यांसारख्या वरील सर्व विषयाबाबत शासन प्रशासनाने चौकशी करुन तात्काळ दखल न घेतल्यास आम्ही सर्व शेतकरी व सर्वसामान्य जनता रास्तारोको,जेलभरो,शिंगाडे मोर्चा अशा प्रकारचे जन आंदोलने करण्यात येतील . त्यात होणारे परिणामास सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
या निवेदनाची प्रत १)जिल्हाधिकारी सो.धुळे २ ) मा.पोलीस अधिक्षक साो. धुळे ३ ) मा.उपविभागीय अधिकारी सो. शिरपूर,जि.धुळे ४ ) मा.पोलीस उपविभागीय अधिकारी साो.शिरपूर,जि. धुळे ५ ) मा.पोलीस निरीक्षक सो.शिरपूर ६ ) मा.अभियंता सो.महावितरण शिरपूर ( ७ ) मा.ग्रामीण अभियंता सो. महावितरण,करवंद,ता.शिरपूर ८ )मा . तालुका उपनिबंधक साो.सहकारी संस्था,शिरपूर ९ ) मा.मुख्य अधिकारी सो.न.पा.शिरपूर यांच्याकडे समक्ष,ई-मेल आणि रजि.टपालाद्वारे दिले आहे.
टिप : मी श्री.ओंकारआबा जाधव ( मा . जि.प.सदस्य),माझा १ फेब्रुवारी २०२२ मंगळवार रोजी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता माझ्या शिरपूर तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी तहसिल कार्यालयासमोर लाक्षणीक (लक्षवेधी)उपोषण करण्यात येणार आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा