Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

माई तुम्ही आम्हाला पोरकं करून गेल्या.... (ज्येष्ठ समाजसेविका स्वर्गीय.सिंधुताई सपकाळ-माई )




आस्था अनघादि फौंउडेशन नाशिक तर्फे दि.५/१/२२ रोजी,... महाराष्ट्राच्या थोर समाजसेविका,ज्यांनी आपल्या साध्या-सरळ राहणीने आणि यांच्या महान विचारांनी संपुर्ण जगात मायेची माऊली म्हणून आपल्या ला माहिती होत्या. 

समाजकार्यात दखल घेऊ पाहणाऱ्या सर्व नवनिर्वाचित समाज सेवकांसाठी परिस असलेल्या माझ्या माई सर्वांच्या सिंधुताई सपकाळ म्हणजे आई.सध्याच्या गृहिणीला,नोकरदार महिलेला एक अपत्य सांभाळताना विविध स्तरावर कसरत करावी लागते.अशातच ते एक नाव,एक मायेचं वादळ,एक मायेचा पदर आणि संपूर्ण प्रेमाची खाण असलेल्या माझ्या माईच काल दुःखद निधन झाल.आणि जे कधीही भरून निघणार नाही.असा परीस आपण काल गमावला.4/1/22 मंगळवार.माईं अनाथांची माय आपल्या पोरक करून गेली.माई प्रत्यक्ष कधी भेटायचा योग आला नाही.माझी इच्छा अपूर्ण राहुन गेली.माई तुम्ही कधी ही स्मरणातून जाणार नाही.तुम्ही सर्वांवर प्रेम करायला शिकवले. तुमच्यापर्यंत मी पोहचु शकली नाही. 

याची खंत कायम राहील.परंतु तुम्ही कायम आठवणीत राहाव्या म्हणून,आज 5/1/22 बुधवार नाशिक श्रमिक नगर सातपूर येथे वृक्षारोपण करून आपल्याला आम्ही श्रद्धांजली अर्पण.आस्था अनघादि फाउंडेशन रुक्मिणीबाई चॅरिटेबल ट्रस्ट, आदिवासी वाल्मीक सेना,- नाशिक तर्फे आपल्याला  श्रद्धांजली अर्पण....माई तुम्ही परत या

शोकाकुल:
 वैशाली निर्मला बापूराव चव्हाण, चंद्रकांत कोळी ,सौ.सरिता कोळी अनघा सौंदाणे, सचिन बदादे ,सौ.पूजा अनिल कोळी सौ. दिपाली अंकुश कोळी आदी उपस्थित ....

वैशाली निर्मला बापूराव चव्हाण नाशिक.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध