Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

शिरपूर मनसे तालुकाध्यक्षपदी पुनमचंद मोरे यांची निवड ! एक योग्य व सार्थ निवड !



सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रदेश उपाध्यक्ष व निरीक्षक सन्माननीय विनयजी भोईटे साहेब यांचे मार्गदर्शनाने जिल्हा संघटक धीरज देसले व जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी यांच्या सुचनेनुसार शिरपूर तालुकाध्यक्षपदी पुनमचंद मोरे. यांची निवड करण्यात आली आहे. 

मनसेच्या स्थापने पासून पक्षात सक्रिय राहून काम करणारे कोणतेही पद नसतांना फक्त महाराष्ट्र सैनिक म्हणून कामगिरी चोख निभावत असतांना अत्यंत गरिबी प्रतिकूल परिस्थितीतुन येऊन कोणत्याही प्रकारच्या पक्षाकडून अपेक्षा न ठेवता, कठीण प्रसंगी जेव्हा अनेक साथीदार सहकारी पक्ष सोडून जात असताना,ठामपणे स्वतः चा पदरमोड खर्च करत पक्षाची धुरा हि शिरपूर तालुक्यातील मातब्बर नेतृत्वाच्या राजकीय पक्षाची पकड असतांना मनसे कार्यकत्यांचे जाळे अगदी महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमेपर्यंत  रोवण्यात अग्रभागी असलेले पुनमचंद भाऊ मोरे अगदी गटाध्यक्ष पासून सुरवात करून मनविसे उपजिल्हाध्यक्ष ते आज मनसे शिरपूर तालुका अध्यक्ष पदी त्यांची सार्थ निवड झाली त्याबद्दल त्यांचे मनसे पदाधिकारी व तालुक्यातील इतर मान्यवरांकडून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.  

तसेच म्हणतात ना हिऱ्याची ओळख जोहरिला असते तशी ओळख हि मनसे पक्ष निरीक्षक श्री विनय जी भोईटे साहेब यांनी कार्यकर्त्यांची तळमळ लक्ष्यात घेऊन निवड केली. त्यांना भविष्यातील वाटचालीस तालुक्यातील भोई समाज व तरुण गर्जना वृत्तसेवेकडून हार्दिक शुभेच्छा. जिल्हातील व तालुक्यातील मनसे कार्यकर्त्याकडून देखील शुभेच्छा देण्यात येत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध