Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

तेलंगणा राज्य चोवीस तास फुकट वीज देणे परवडते, परंतु महाराट्रात विकत घेऊनही वेळेवर मिळत नाही



एकीकडे तेलंगणात आता शेतकऱ्यांना चोविस तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र महावितरणकडुन संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची वीज कनेक्शन तोडले जात आहेत. एकाच देशातील दोन राज्यात ही विभिन्न परिस्थिती आहे. तेलंगणासारखी सुविधा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळु शकत नाही हे दुर्दैवी आहे. याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्याच्या उर्जामंत्र्यावर निशाणा साधला आहे..
याबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल म्हणाले की, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना शेतकर्‍यांची अवस्था समजली म्हणुन त्यांनी शेतकर्‍यांप्रती कृतज्ञता दाखवत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला,आता महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकर्‍यांच्या वीजप्रश्नी कृतघ्नतेचे दर्शन घडवु नये आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचा आदर्श घ्यावा व अनुकरण करावे..
याबाबत पुढे बोलताना बागल म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या महावितरणकडुन शेतकर्‍यांची प्रचंड पिळवणूक सुरू आहे.. एकीकडे महाराष्ट्रात वीजबिलाच्या नावाखाली वसुली सुरू आहे तर दुसरीकडे तेलंगणात मात्र मोफत वीज मिळते, "तेलंगणात शेतकरी राहतो तर महाराष्ट्रात काय दरोडेखोर राहतात काय..?" हा प्रश्न राज्यातील सामान्य शेतकर्‍यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही.. 
जोपर्यंत सरकार या जनभावनेचा आदर करून शेतकर्‍यांना या वीजबीलाच्या जोखडातून मुक्त करत नाही तोवर स्वाभिमानीचे नेते आदरणीय राजु शेट्टीसाहेबांच्या नेतृत्वात स्वाभिमानीचा महावितरणविरोधातील लढा हा सुरूच राहील व भविष्यात आणखी तीव्र होईल असे बागल यावेळेस बोलताना म्हणाले..

तरुन गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध