Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १० जानेवारी, २०२२

कोपर्ली इंदाणी हायस्कुलचे शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश..!




कोपर्ली प्रतिनिधी : नंदुरबार तालुका विधायक समितीचे इंदाणी हायस्कुल कोपर्ली मधील विद्यार्थ्यांनी शासकीय प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले.
यात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 06 तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 13 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले.

प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवीतील जागृती धनराज पाटील, साक्षी जितेंद्र वानखेडे,मोहित अरूण पाटील,गणेश ईश्वर साठे, दिनेश हिम्मतसिंग गिरासे,मसिरा फिरोज शेख.तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवी मध्ये अविनाश गणेश ठाकरे,दिनेश योगेश पाटील,महेश बारकु पाटील, मेहबुब लतीफ फकिर,अनिकेत इंद्रसिंग गिरासे, पवन सुभाष कोळी, सानिया शब्बीर फकीर, वर्षा किशोर पाटील, सुकन्या चंद्रसिंग गिरासे, वैष्णवी किशोर गिरासे, विक्रम दिनेश भोई, सई इंद्रसिंग गिरासे, भगवान रविंद्र पाटील या विद्यार्थ्यांचे गौरव व कौतुक नंदुरबार तालुका विधायक समिती संस्थेचे चेअरमन माजी आमदार चंद्रकांत भैय्या रघुवंशी, व्हाईस चेअरमन मनोज भैय्या रघुवंशी, सरचिटणीस यशवंत पाटील, शेतकरी सहकारी संघ नंदुरबार अध्यक्ष बी.के.
पाटील,संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक पुष्पेंद्र रघुवंशी,शाळेचे प्राचार्य सयाजी पाटील, पर्यवेक्षक रमेश पाटील यांनी केले या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपशिक्षक संदिप साळूंखे,मनोज राजपूत, शत्रूघ्न पटेल, प्रल्हाद पाटील, प्रकाश पाटील,भूषण सोनार, यशवंत वळवी, केतन चव्हाण, जितेंद्र सोनवणे,मनिषा देवरे,अनिता चौधरी, प्रशांत वसावे, हरीश परदेशी, राहुल साळूंखे, गणपतराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांचे लाभले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध