Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ४ जानेवारी, २०२२
तीन मुले असून ही मुलींनीच दिला आईचा मृत देहास खांदा
...मौजे लिहाखेडी ता. सिल्लोड (हल्ली मुक्काम औरंगाबाद) येथील गं.भा.चंद्रभागाबाई आनंदा साखळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले..त्यांना तीन मुले आणि तीन मुली आहेत..मोठा मुलगा हनुमंता आनंदा साखळे,कृषी अधिकारी,मधला मुलगा बाळाराम आनंदा साखळे, हाय कोर्टात क्लर्क,तर लहान मुलगा नबाजी आनंदा साखळे कंपनीत नोकरीला आहेत...आईने अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून ह्या तीनही मुलांना मोठे केले..नोकरीला लावले पण शुद्ध हरपलेल्या ह्या मुलांनी आईस सांभाळायला सपशेल नकार दिला..अतिशय प्रामाणिक,नम्र,गरीब,कष्टकरी असलेल्या आईस मुलांनी सांभाळायला नकार दिल्यामुळे गेल्या वीस वर्षांपासून चंद्रभागाबाई यांचा सांभाळ त्यांची मुलगी सुभद्रा व जावई श्रीकृष्ण टाकसाळे हे करत होते...इतक्या वर्षांपासून अनेकदा मुलगी व जावई यांनी फोन करून सुद्धा ही तीनही मुलं सख्या आईला साधे भेटायला सुद्धा आले नाहीत की कधी विचारपूस केली नाही.आज आईचे निधन झाल्याचे कळल्यावर सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी दोन भाऊ आले व दूरवर उभे राहिले.. सर्वात मोठा मुलगा आलाच नाही..हे सर्व पाहून चंद्रभागाबाई यांच्या तिन्ही लेकिंनी व हर्सूल बालाजी नगर परिसरातील सर्व मंडळीनी तसेच नातलगांनी आईच्या प्रेतालासुद्धा मुलांना हात लावू देणार नाही असा पावित्रा घेतला..शेवटी जिजाबाई, सुभद्रा व सुनीता ह्या तिन्ही लेकींनी आईस खांदा दिला व सर्व अंतिमसंस्कार पूर्ण केले...अंतिम समयी माजी उपमहापौर विजय औताडे यांचेसह परिसरातील नागरिक,नातलग,मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.. आयुष्यभर काबाड कष्ट करून मुलांना मोठे करून आज ते चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत पण सख्या आईच्या म्हातारपणात,आजारपणात लक्ष न देणाऱ्या,आईला घराबाहेर काढणाऱ्या ह्या मुलांबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे तर...लेक सुभद्रा आणि जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आईच्या केलेल्या सेवेसाठी सर्वत्र कौतुक होत आहे..
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर तालुक्यातील मौजे मूडी ,बोदर्डे बाम्हणे, शिवारात महसूल विभागाने केलेल्या कारवाईत वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले आ...
-
शिरपूर प्रतिनिधी : शहरातील मुख्य व्यापारी परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएमची यंत्रणा फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा