Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
जात वैधता प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळवून देण्याकरीता 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन 45 हजारांची लाच स्विकारतांना कनिष्ठ लिपीकाला धुळे लाचलुचपत विभागाने रंगेहाथ ताब्यात
जात वैधता प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळवून देण्याकरीता 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन 45 हजारांची लाच स्विकारतांना कनिष्ठ लिपीकाला धुळे लाचलुचपत विभागाने रंगेहाथ ताब्यात
धुळे प्रतिनिधी:- जात वैधता प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळवून देण्याकरीता 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन 45 हजारांची लाच स्विकारतांना कनिष्ठ लिपीकाला धुळे लाचलुचपत विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे.याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळणे करीता आवश्यक कागदपत्रासह मुळ जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समिती धुळे येथे जमा केले होते.तक्रारदार यांना सन 2017 मध्ये जात वैधता प्रमाणपत्र मिळाले असून त्यांनी अर्जासोबत जमा केलेले मुळ जात प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी जात पडताळणी समितीचे संबधीत लोकसेवक कनिष्ट लिपीक विजय वाघ यांची भेट घेऊन सदर जात प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळवून देण्याची विनंती केली असता, लिपीक विजय वाघ यांनी तक्रारदार यांचे जात प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळवून देण्या करता 50 हजार रुपयांची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाच्या धुळे पथकाला तक्रार केल्यानंतर दि 14 फेब्रुवारी रोजी यांनी पंचसमक्ष तक्रारदार यांच्याकडे 45 हजार रूपये लाचेची मागणी केली.लाचलुचपत पथकाने पंचसमक्ष सापळा रचला असता धुळे शहरातील सिध्दीविनायक गणपती मंदिरा समोरील रस्त्यावर दि 15 रोजी सदर 45 हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना कनिष्ठ लिपीक विजय वाघ यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधिक्षक अनिल बडगुजर पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे,पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण सह राजेन कदम,कैलास जोहरे,शरद काटके,
कृष्णाकांत वाडीले,प्रशांत चौधरी,भुषण खलाणेकर,भुषण शेटे,महेश मोरे,संदिप कदम,गायत्री पाटील,सुधीर मोरे,जगदीश बडगुजर यांनी कारवाई केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा