Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील शिवसेना आमदार लता सोनवणे यांना जात पडताळणी समितीचा दणका..!
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील शिवसेना आमदार लता सोनवणे यांना जात पडताळणी समितीचा दणका..!
चोपडा प्रतिनिधी:जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लता सोनवणे यांना नंदुरबारच्या जात पडताळणी समितीने दणका दिला आहे. सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे.या प्रकरणासंदर्भात चोपड्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी तक्रार केली होती.
लता सोनवणे यांचा टोकरे कोळी अनुसूचित जमातीचा दाखला निवडणुकीच्या प्रयोजनार्थ १० एप्रिल २०१९ रोजी जात पडताळणी समितीला सादर केला होता. त्यानंतर त्यांचा अनुसूचित जमातीचा दावा ४ नोव्हेंबर २०२० रोजीच्या न्यायालयाच्या विस्तृत आदेशान्वये जात पडताळणी समितीने अवैध घोषित केला होता.समितीच्या अवैध आदेशाविरुद्ध आमदार सोनवणे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.
या निर्णयाविरोधात पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे लता सोनवणे यांनी सांगितले. औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात या प्रकरणी ३ डिसेंबर २०२० रोजी निर्णय देताना समितीचा आदेश रद्दबातल करण्यात आला.अर्जदाराला सक्षम प्राधिकारी म्हणजेच,अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून नव्याने जात प्रमाणपत्र प्राप्त करून सात दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश त्यावेळी देण्यात आले होते.
तसेच सदर प्रकरण चार महिन्यात निकाली काढण्याबाबत समितीस निर्देश दिले होते. म्हणून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आमदार लता सोनवणे यांनी नव्याने सक्षम प्राधिकारी यांच्याकडून जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करून समितीला ९ डिसेंबर २०२० रोजी प्रस्ताव सादर केला होता.
लता सोनवणे यांचा प्रस्ताव दाखल करताना पूर्वीच्या पुराव्यांव्यतिरिक्त नवीन अधिकचे पुरावे प्रस्ताव सोबत सादर करण्यात आले. तसेच सदर पुरावे प्रथमच समितीसमोर आल्याने पुराव्यांची सत्यता पडताळणी करणे आवश्यक असल्याने आमदार सोनवणे यांचे प्रकरण पोलीस दक्षता पथकाकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा