Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
पाटबंधारे उपविभाग साक्री येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वरिष्ठ अधिकारी यांचा अंकुश नाही का ?
पाटबंधारे उपविभाग साक्री येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वरिष्ठ अधिकारी यांचा अंकुश नाही का ?
साक्री प्रतिनिधी:दिनांक 09/02/2022 रोजी ठीक 12:30 मि. येथे माननीय तहसीलदार साहेब साक्री यांचे पत्र व माननीय नामदार जलसंपदा राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे पत्र जामकी धरण भांडणे शिवार पाटचारी संदर्भात गेल्या दहा वर्षापासून शेतकरी बांधवांना त्याचा कुठलाही मोबदला मिळालेला नसून याविषयी विचारपूस करण्यासाठी आम्ही गेलो असता पाटबंधारे उपविभाग साक्री येथील अधिकारी व कर्मचारी आपापल्या जागेवर आपल्या टेबलाजवळ एकही अधिकारी व कर्मचारी हजर नसून आपली मनमानी बिनधास्तपणे सुरू आहे हा प्रसंग पहिला नसून माननीय नामदार जलसंपदामंत्री जयवंत पाटील साहेब साक्री दौऱ्यावर आले असता त्यावेळेस सुद्धा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने याच विषयाचे निवेदन माननीय जलसंपदामंत्री यांना दिले होते.
पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचा अशा मनमानी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कुठला अंकुश नाही का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला व शेतकरी बांधवांना नेहमी पडत असतो शेतकरी बांधवांचे नाळ या कार्यालयाशी जन्मजात असून शेतकरी बांधव गाव खेड्यातून आपल्या शेतीसाठी पाण्याचा प्रश्न घेऊन या कार्यालयात येत असतात परंतु शेतकरी बांधवांच्या हेल पट्ट्या मारून सुद्धा काही उपयोग होत नाही कारण की कार्यालयीन वेळेत एकही अधिकारी व कर्मचारी त्यांच्या जागेवर हजर राहत नाही शिपायाला जर विचारले साहेब कुठे गेले आहेत तर नेहमी त्यांच्याकडून एकच उत्तर मिळते की साहेब मिटींगला गेले आहेत किंवा बाहेर गेले आहेत असे उडवाउडवीचे उत्तर नेहमी शेतकरी बांधवांना व सर्वसामान्य जनतेला मिळत असते. अशा अधिकारी लोकांवर व येथील कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब साक्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे असे नाही झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन तहसील कार्यालय साक्री येथे छेडण्यात येईल असा इशारा साक्री तालुका प्रमुख श्री कैलास भदाणे.
तालुका उपप्रमुख नाना भाऊ शेलार.
हेमंत सोनवणे दिव्यांग क्रांती आंदोलन साक्री तालुका अध्यक्ष.योगेश जाधव प्रहार शेतकरी संघटना साक्री तालुका अध्यक्ष.
सोमसिंग राजपूत तालुका संपर्कप्रमुख
राजेंद्र कोरडकर कार्यकर्ता राहुल भाऊ गवळे कार्यकर्ता
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
अशा बेशिस्त व बेजबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासनाने घरचा रस्ता दाखवला पाहिजे प्रहार तर होणारच
उत्तर द्याहटवा