Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
जळीत प्रकरणी आरोपी विकेश नगराळे ला मरेपर्यंत जन्मठेप सत्र न्यायालयाचा निकाल ! प्राध्यापिका ( अंकिता ) आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिला होता
जळीत प्रकरणी आरोपी विकेश नगराळे ला मरेपर्यंत जन्मठेप सत्र न्यायालयाचा निकाल ! प्राध्यापिका ( अंकिता ) आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिला होता
वर्धा, हिंगणघाट तालुक्यातील नंदोरी येथील प्राध्यापिका(अंकिता) जळीत प्रकरणी न्यायालयाने आज आरोपी विकेश नगराळे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली विकेश नगराळे याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी या प्रकरणी दोषी ठरविले होते. नगराळे हा मागील २ वर्षांपासून कारागृहात शिक्षा भोगत असला तरी शिक्षा भोगतांना हा कालावधी गृहीत धरला जाणार नाही.
असेही न्यायालयाने स्पष्ट केले अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली ३ फरवरी २०२० ला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील नंदुरी गावातील चौकात प्राध्यापिका ( अंकिता ) ही सकाळच्या सुमारास महाविद्यालयात जात असतांना आरोपी विकेश नगराळे चौक परिसरात ती आली असता आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले यात ती तरुणी ४०% भाजली तिच्यावर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते
सात दिवस पीडितेवर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्या पीडितेचा १० फरवरी २०२० ला मृत्यू झाला विशेष म्हणजे आज या दुर्दैवी घटनेच्या स्मृती दिनी १० फरवरी २०२२ लाच हिंगणघाट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
सदर प्रकरण दुर्मीळातीळ दुर्मिळ नसल्यामुळे फाशीची शिक्षा देता येत नाही असेही न्यायालयाने स्पष्ट करीत या प्रकरणात आरोपीला ५ हजार रुपयांचा दंड व मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा सुनावली.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा