Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

म्हसदी गटाचे पं.समिती सदस्य सौ अर्चनाताई देसले प्रतिनिधी मा.पंचायत समिती सदस्य माऊली यांनी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट कृषीमंत्री मा.दादासो.भुसे साहेब यांची भेट घेवून निवेदनाद्वारे विविध मागनी केली



धुळे म्हसदी येथील शिवसेना नेते राजधर देसले यांनी आपल्या कार्यकर्ते सह धनदाई मंडळाचे मा.अध्यक्ष गंगाराम देवरे वेडु देवरे बी पी वाणी विपुल वाणी  ककानीचे अरुण बेडसे भडगाव ज्ञानेश्वर बेडसे आबा बेडसेआदी.साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेती विषयी  विविध योजना कृषी विभागाकडून राबवल्या जातात.परंतु त्या दिलेल्या अनुदानात कोणतेही काम पूर्ण होत नाही.ते अनुदान शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मिळते. उदा.कांदा चाळ अनुदान 87000 रुपये मिळत असून ऐवढ्या कमी अनुदानात कांदा चाळ होत नाही.त्यामध्ये आपल्या कृषी विभागाने मोठा बदल केला आहे. कांदा चाळ आर.सी.सी.बिमची असल्यामुळे ती कांदा चाळ पूर्ण होऊ शकत नाही.त्यामुळे कांदाचाळीला 3 ते 4 लाख रुपये खर्च होतो.त्यामुळे शेतकर्‍याला न परवडणारे अनुदान मिळते ते वाढून देण्यात यावे.तसेच शेतीसाठी लागणारे रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले असून शेती करणे अवघड झाले आहे.त्यामुळे खतांचे भाव कमी करण्यात यावे.शेती व्यवसायासोबतच कुक्कुटपालन व्यवसाय व दुग्ध व्यवसाय यासाठी भरीव निधी मिळावा.तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील पावसाळ्यातील नुकसान भरपाई व पिकविमा अद्याप मिळालेला नाही.तरी तो मिळावा,शेतकऱ्यांना मिळणारा विजपुरवठा वीजवितरण कंपनी बिले न भरल्यास वीज पुरवठा खंडित करू असे सांगतात तरी शेतकऱ्यांना अशा अवेळी येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे तरी तो खंडीत न करू द्यावा तसेच दिवसा विजपुरवठा मिळावा,ट्रान्सफार्मर खराब झाल्यास तो लवकर सुधारून मिळावा, म्हसदी गटातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वाढीव सिंचन विहीरी मिळाव्या,अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीविषयी बैल जोडी उपकरणे व शेती अवजारे मिळावी, म्हसदी गटातील बऱ्याच शेतकऱ्यांना शेत शिवार पाणंद रस्त्याची खुप मोठी समस्या आहे शेतकर्‍यांना शेतमाल काढताना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.तरी पाणंद रस्ते स्थानिक पंचायत समितीकडून मंजुर करण्यात यावे अशा मागण्या मा.पं समिती सदस्य माऊली यांनी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट कृषीमंत्री मा.दादासो. भुसे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध