Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२
बेकायदेशीर विदेशी दारु वाहतुकीवर नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
नंदुरबार(प्रतिनिधी):पोलीस उप
महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र,नाशिक यांचे आदेशान्वये संपुर्ण नाशिक परिक्षेत्रात अवैध दारू तस्करांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे सक्त निर्देश अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना बातमी मिळाली की, दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी मध्यरात्री मंदाणा ता.शहादा गावाकडुन एक लाल रंगाचे ट्रॅक्टरमध्ये शेणखत भरलेले असून त्याखाली देशी विदेशी दारुचे खोके ठेवून अवैध देशी विदेशी दारुची चोरटी वाहतूक करणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली होती,
त्या अनुषंगाने मा,पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदर माहिती कळवून योग्य ते मार्गदर्शन करून तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशीत केले.त्या अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील,
अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पिंपर्डे ता.
शहादा गावाच्या पूढे रस्त्यावर दिदबा धरून बसले असता 00.45 वा. सुमारास असलोद गावाकडुन पिंपडे गावाकडे एक लाल रंगाचे ट्रॅक्टर येतांना दिसले म्हणून पथकातील अमंलदारांनी त्यास हाताने व बॅटरीच्या सहायाने ट्रॅक्टर उभे करण्याचा इशारा देवून ट्रॅक्टर थांबविले.त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या अमंलदारांनी आपली ओळख देवून ट्रॅक्टर चालकास नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव लखन ऊर्फ गणेश दला भिल वय- 28 रा.वाडी बुद्रुक ता. शिरपुर जि.धुळे असे सांगितले.ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टरमध्ये काय भरलेले आहे बाबत विचारपुस करता त्याने ट्रॅक्टरमध्ये शेणखत भरलेले आहे.
बाबत सांगितले मिळालेल्या बातमीप्रमाणे ट्रॅक्टरमध्ये शेणखत दिसून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टरमधील शेणखत बाजुला केले असता तेथे विदेशी दारुचे कादी पृष्ठाचे खोके ठेवलेले मिळुन आले.ट्रॅक्टर चालकास दारु वाहतुकीचा परवाना आहे काय ? असे विचारले असता त्याचेकडे दारु वाहतुकीचा परवाना नसल्याचे कळविले.तसेच ट्रॅक्टर चालकास सदरचा माल कोणाकडून आणला बाबत विचारले असता त्याने बोराडी ता.शिरपुर येथील पिंटू पाटील पूर्ण नांव माहित नाही याचेकडून घेवून अक्कलकुवा गावाच्या पुढे 2 ते 3 कि.मी.वर सेडणेकामी घेवून जात आहे
बाबत संपूर्ण माहिती दिली.
सदर ट्रॅक्टरमधील संपूर्ण शेणखत बाजुला करुन पाहता त्यात खाकी रंगाचे खोके दिसुन आल्याने खोके उघडून पाहिले असता त्यात 6 लाख 86 हजार 400 रुपये किमतीची बॉम्बे व्हिस्कीच्या 180 एम. एल.चे एकुण 110 बॉक्स व त्यामध्ये 5280 सिलबंद काचेच्या बाटल्या 1 लाख 68 हजार 480 रुपये किमतीची किंगफिशर स्ट्राँग बिअरचे 500 एम.एल. चे एकुण 39 बॉक्स व त्यामध्ये 936 बिअरचे पत्रटी टिन,55 हजार 200 रुपये किमंतीची माऊन्टस-6000 सुपर स्ट्राँग बिअरचे 500 एम. एल.चे एकुण 20 बॉक्स व त्यामध्ये 480 बिअरचे पत्रटी टिन, तसेच 7 लाख रुपये किमंतीचे एक महिलंद्रा कंपणीचे 575 DI XP PLUSE मॉडेल असलेले लाल रंगाचे ट्रॅक्टर व मागे ट्रॉली बिना नंबरचे असलेले असा एकुण 16 लाख 10 हजार 080 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील,अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलीस हवालदार दिपक गोरे,पोलीस नाईक-विकास कापुरे,
पुरुषोत्तम सोनार,पोलीस शिपाई विजय ढिवरे यांचे पथकाने केली असून पोलीस अधीक्षक,नंदुरबार पी.आर.पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा