Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

त्या’कागदांवर सही पाहिजे तर फडणवीसांना ५० कोटी द्यावे लागतील,असे सांगून किरीट सोमय्यांनी करोडो उकळले...



17 फेब्रुवारी 2022: सध्या शिवसेनेचे खा. संजय राऊत हे खूपच जास्त चर्चेत आहेत. त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत विविध आरोप केले आहेत.
भाजपनेते किरीट सोमय्या यांनी देखील याला प्रतिउत्तर दिले.परंतु आता एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावे कोट्यवधी रुपये उकळले आहेत. तसेच अमित शाहांची भीती दाखवूनही वसुली केली आहे, असा आरोप आज संजय
राऊत यांनी केला.पवई पेरुबाग झोपडपट्टी पुनर्वसनाच्या यादीवर फडणवीसांची सही घेण्यात आली.हे संपूर्ण प्रकरण बोगस आहे. 

तब्बल ४३३ लोकांकडून २५-२५ लाख रुपये घेतले गेले. एजंटच्या माध्यमातून. २००-३०० कोटींचा हा व्यवहार झाला. याबाबत ट्रकभर कागद माझ्याकडे आहेत.
पुनर्वसनाच्या कागदावर सही करायची असेल तर फडणवीसांना ५० कोटी द्यावे लागतील,असे सांगून किरीट सोमय्यांनी पैसे उकळले. यामध्ये ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा झाला अशी आमची शंका आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सदर पुनर्वसन प्रकल्पात किरीट सोमय्या आणि त्यांच्या एजंटसनी ४३३ लोकांची नाव घुसवली. हे लोक या जागेवरील मूळ रहिवासी नव्हते. या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी तब्बल ३०० ते ४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

मी या सगळ्याची कागदपत्रे ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार आहे असेही राऊत म्हणाले. भ्रष्टाचाराबाबत बोलायचे झाले तर किरीट सोमय्यांची अशी २११ प्रकरणं माझ्याकडे आलेली आहेत. यात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे.

किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावे शेकडो कोटी रुपये उकळले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नावावर धमक्या देऊनही पैसे उकळले आहेत.
हे रेकॉर्डवर आहे. काय करायचे ते करा. उखाडना है तो उखाड लो, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध