Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

शिरपुर तालुक्यातील मांजणीपाडा गावशिवारातील अतिदुर्गम भागातील जंगलात डोंगराच्या पायथ्याशी गांजा शेतीवर कारवाई



शिरपुर तालुक्यातील मांजणीपाडा गावशिवारातील अतिदुर्गम भागातील जंगलात डोंगराच्या पायथ्याशी गांजा शेतीवर कारवाई करण्यात आली.यात १ लाख ३१ रुपये किंमतीचा ६५ किलो वजनाची ओल्या गांजाची झाडे जप्त करण्यात आली असुन त्यात एकाविरुध्द शिरपुर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मांजणीपाडा गावाच्या शिवारातील अतिदुर्गम भागातील जंगलात , डोंगराच्या पायथ्याशी आर्थिक फायद्यासाठी गांजा झाडांची लागवड केल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश सिरसाठ यांना मिळाली होती. 

त्या अनुषंगाने एक पथक तयार करून दि . २३ रोजी दुपारी २. २० वाजेच्या सुमारास रुमाल्या खुमान पावरा खेडत असलेल्या शेतात छापा टाकला.या ठिकाणी विनापरवाना आर्थिक फायद्यासाठी गांजाची लागवड केलेली आढळून आली . ही झाडे मुळासकट उपटून जप्त करून पोलिस ठाण्यात आणून मोजमाप केली असता १ लाख ३१ हजार रुपये किमतीचे ६५ किलो ५८० ग्रॅम वजनाच्या ३ ते ४ फुट उंचीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. 

याप्रकरणी हेकॉ प्रेमसिंग उत्तमसिंग गिरासे यांनी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रुमाल्या खुमान पावरा याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम २० व २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील,अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव,पोलिस उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ,पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण गवळी , नियाज शेख,हेकॉ प्रेमसिंग गिरासे,संजय धनगर,पोना धनगर,चौधरी,भुषण चौधरी , पठाण पावरा,इसरार फारुकी यांच्या पथकाने केली आह. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध