Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या,नाय वरन -भात लोन्चा कोण नाही कोन्चा ' या मराठी चित्रपटामुळे त्यांच्या अडचणी वाढ



अभिनेते -दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या,नाय वरन -भात लोन्चा कोण नाही कोन्चा ' या मराठी चित्रपटामुळे त्यांच्या अडचणी वाढत आहेत.चित्रपटात अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी महेश मांजरेकर यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा त्यांनी या प्रकरणी मौन सोडत स्पष्टपणे सांगितले की मी माझ्या चित्रपटासोबत आहे.

या प्रकरणावर स्वतःमहेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले की त्यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे.त्यामुळे माझे वकील त्यानुसार उत्तर देतील.मी माझ्या चित्रपटाच्या बाजूने उभा आहे. कारण चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ने मंजुरी दिली आहे.त्यामुळे याबाबतीत मी आणखी काय सांगू ? ' असंही ते म्हणाले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध