Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना आशा व गटप्रवर्तकांना थकीत मानधन अदा करण्याचे सहसंचालकांचे आदेश



राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या थकीत मानधन तात्काळ अदा करून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची होणारी उपासमार थांबवावी अन्यथा कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शासनाला निवेदनाद्वारे संघटनेने दिला होता.
         
परिणामी श्री.संजय सरवदे सहसंचालक (अतांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन मुंबई यांनी सप्टेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२१ या महीन्यांचे मानधन अदा करण्याबाबत सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी महानगर पालिका आणि मुख्याधिकारी कटक महामंडळ यांना कालच दि.०२.०२.२०२२ रोजी आदेशित केले आहे.त्यामुळे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना थकीत मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
           
थकीत मानधनासाठी लागणारा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे.थकीत मानधनासाठी संघटनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश आलेले आहे.अजुनही नियमित कामांचा मोबदला थकीत असून तो मिळविण्यासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे.त्यालाही लवकरच यश येईल असा विश्वास आहे.
            
त्यामुळे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी आपली संघटना अधिकच भक्कम करावी आणि कोणाच्याही भुलथापांना बळी पडू नये.असे आवाहन मायाताई परमेश्वर,रामकृष्ण बी.पाटील, युवराज बैसाणे,सुधीर परमेश्वर,अमोल बैसाणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध