Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
किसान रेल्वेचा महाराष्ट्राला सर्वात जास्त फायदा रेल्वे मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे
किसान रेल्वेचा महाराष्ट्राला सर्वात जास्त फायदा रेल्वे मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे
दिल्ली "भारतीय रेल्वे विभागाच्या मध्य रेल्वेद्वारे चालविल्या जाणाऱ्या किसान रेल्वेची च्या माध्यमातून महाराष्ट्राला सर्वात जास्त फायदा मिळालेला आहे. सोलापूर, लासूर, नाशिक, जालना, औरंगाबाद, सांगोला, भुसावळ, रावेर व सावदा यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून कृषिमाल देशातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्या गेला आहे." असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज केले. केंद्रीय कृषीमंत्री श्री नरेंद्रसिंह तोमर जी व केंद्रीय रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी यांचे उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरंसिंग च्या माध्यमातून 'हजाराव्या किसान रेल्वेला' हिरवी झेंडा दाखवून रवाना केले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीमती रक्षा खडसे जी, महाराष्ट्र सरकारचे मंत्री श्री गुलाबराव पाटील जी, महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील जी, मध्य रेलवेचे जीएम श्री अनिल कुमार लाहोटी जी व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे व रेल्वेचे सर्व अधिकारी आणि शेतकरी बांधव सावदा येथून उपस्थित होते.
भारत हा कृषिप्रधान देश आहे, शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
शेती क्षेत्रसाठीआपल्या सरकारने मोदिजींचे नेतृत्वात अनेक निर्णय आपलं सरकार घेत आहे व घेत राहिल. याचाच एक भाग म्हणून रेल्वे मंत्रालयाने देशाच्या अनेक भागातून ‘किसान रेलवे’ सुरु केल्या आहेत." याद्वारे जलदगतीने शेतकऱ्यांचा नाशवंत माल ज्या ठिकाणी बाजार भाव चांगले आहेत त्या ठिकाणी ५०% भाड्यावर पाठवविल्या जातो. मला अत्यंत आनंद होतोय की आज ही मध्य रेल्वे विभागातुन हजारावी ‘किसान रेल’ सावदा-महाराष्ट्र ते आदर्शनगर-दिल्ली येथे सुटत आहे" असे दानवे म्हणाले.
शेतकऱ्याच्या मालाच्या हमी भावात सातत्याने वाढ करुन रिकॉर्ड खरेदी शासनाने केली आहे. शेतकऱ्याच्या खात्यावर दर वर्षी किसान सन्मान निधी चे पैसे जमा करणे. असे अनेक निर्णय या सरकारने घेतले, त्याच बरोबर स्थानिक उत्पादनांना देश पातळीवर बाजारपेठा देखिल उपलब्ध होणार आहेत.
देशातील सर्व घटकांच्या हितासाठी व जीवन सुसह्य करण्यासाठी अश्या प्रकारच्या अनेक रेल्वे सुविधा सुरु केल्या बद्दल मंत्री श्री दानवे यांनी पंतप्रधान यांचे आभार व्यक्त केले.
‘किसान रेल’ शेतकर्यांना त्यांच्या कृषी मालाची जलद, निर्धोक, सुरक्षित आणि किफायतशीर रीतीने कमीत कमी खर्चा मध्ये अगदी दूरच्या स्थानापर्यंत विक्री करण्याची सुविधा देते. जेणेकरून क्षेत्रातील शेतकऱ्यांचा विकास होईल व स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळेल व अधिक रोजगार उपलब्ध होतील.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा