Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते पी.डी.पाटील व मनीषा शिरसाठ यांना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन येथे "तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले-समता शिक्षक पुरस्कार प्रदान



धरणगाव येथील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील व पाळधी जि.प.शाळेच्या आदर्श शिक्षिका मनीषा शिरसाठ यांना आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव अल्पबचत भवन येथे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद यांच्यातर्फे " जिल्हास्तरीय तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले गुणवंत समता शिक्षक पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. समता शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक म.रा.स.शि. परीषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ उपाध्यक्ष रावसाहेब जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता शिक्षक परिषदेचे संचालक अध्यक्ष डी.के.अहिरे,तर प्रमुख मान्यवर म्हणून महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, प्रमुख वक्ते प्रफुल्ल शशिकांत होते. 
         
सर्वप्रथम छत्रपती शिवराय,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले,विद्येची देवता सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.प्रफुल्ल शशिकांत यांनी ऑनलाइन शिक्षण काळाची गरज या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.विचारपीठावरील अनेक मान्यवरांनी मनोगतातून ज्ञानदानाचे महत्त्व पटवुन दिले.
 
शिक्षक हा समाज घडविण्याचा शिल्पकार आहे असे प्रतिपादन नामदार गुलाबरावजी पाटील यांनी केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रा.भरत शिरसाठ,अजय भामरे लिखित स्मृतीपात्र सत्यशोधक प्रभावती भालचंद्र बावस्कर यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
           
संस्थेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली तसेच फुले - शाहू - आंबेडकरांचा विचार हाच आमचा आधार, असे प्रतिपादन केले.
          
तात्यासाहेबांचा स्मृतीदिन हा खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवसाचे औचित्य साधून मला तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले - गुणवंत समता शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हे मी करत असलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची पावती आहे. पुरस्काराने बळ व ऊर्जा मिळते.मी ही ऊर्जा घेऊन सातत्याने शैक्षणिक, सामाजिक कार्य करेल व तात्यासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांनी केले.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  छाया सोनवणे, रणजीत सोनवणे,मनोज नन्नवरे, हेमंत लोहार यांनी तर आभार प्रा.मनीषा देशमुख यांनी मानले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध