Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

एरंडोल येथे निशुल्क सात दिवसीय योग साधना शिबिरचे उद्घाटन




(कृष्णा अरुण महाजन,एरंडोल तालुका प्रतिनिधी)

एरंडोल येथील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल मध्ये आज सकाळी निशुल्क सात दिवसीय योग साधना शिबिराचे उद्घाटन,प्रतिमापूजन व माल्यार्पण शाळेचे प्रिन्सिपल सुनिता पाटील मॅडम यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी असिस्टंट प्राध्यापक ज्योती वाघ मॅडम (सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी, जळगाव) या प्रमुख पाहुणे म्हणून तर योग शिक्षक देवयानी महाजन,कृष्णा महाजन,तसेच  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

शिबिरा प्रसंगी योगशिक्षक देवयानी महाजन, प्रमुख पाहुण्या प्राध्यापक ज्योती वाघ व अध्यक्ष सुनिता पाटील मॅडम यांनी योग साधना चे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सदर योग साधना शिबिर 27 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध