Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

संत गाडगे बाबांची शिकवण आचरणात आणा - जयंतीदिनी धुळे जि.प.अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांचे प्रतिपादन



प्रतिनिधी शिरपूर: राष्ट्रसंत गाडगे बाबांची शिकवण प्रत्येक नागरिकाने आचरणात आणली पाहिजे.बाबांचे विचार अंमलात आणल्याशिवाय समाज प्रगती करू शकणार नाही़.संत गाडगे बाबा दिन दुबळे, अनाथ,अपंगाची सेवा करणारे कर्मयोगी होते.

यावेळी परिट-धोबी समाजातील गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचे आश्वासन धुळे जि.प.अध्यक्ष तथा किविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ़तुषार विश्वासराव रंधे यांनी मार्गदर्शन करतांना केले़ २३ रोजी शहरातील श्रीनगर कॉलनीतील श्रीसंत गाडगे बाबा उद्यानात संत गाडगे बाबा यांच्या १४६ व्या जयंतीचा कार्यक्रम येथील परिट (धोबी) सेवा मंडळातर्फे साजरा करण्यात आला़ सुरूवातीला पुतळ्याला मार्ल्यापण करून अभिवादन करण्यात आले़ सुरेखा बेडीस्कर यांनी गाडगे बाबांच्या भजनाने केली़.

यावेळी धुळे जि.प.अध्यक्ष तथा किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ़ तुषार विश्वासराव रंधे, अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथ बोरसे, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, किविप्र संस्थेच्या खजिनदार आशा रंधे,प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, यांच्या हस्ते मार्ल्यापण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी धुळे जिल्हा ग.स बँक चेअरमन निशांत रंधे,धुळे जिल्हा बँकेच्या संचालिका सीमा रंधे, प्राचार्या सारीका रंधे, डॉ.रजनी लुंगसे,उद्योजक अशोक बेडीस्कर,
व्हि.व्हि.दिघे,जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोरसे,प्रा.सदाशिव ठाकरे,जिल्हा उपाध्यक्ष भगवान वाघ,सुरेश कुवर,वसंत सुर्यवंशी,तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, उपाध्यक्ष उमेश खैरनार, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर येशी, युवक शहराध्यक्ष योगेश सैंदाणे,सुनिल सुर्यवंशी,राजेंद्र येशी,नरेश पवार,डॉ.ग़जानन पवार,अविनाश पवार, मोहन बोरसे,अनिल बोरसे,रतिलाल वाल्हे, संजय येशी,धनराज पवार,मोहन येशी, रविंद्र वाघ, हर्षवर्धन बोरसे,नामदेव बोरसे, जितेंद्र बोरसे,दिनेश जाधव, ज्ञानेश्वर जाधव, गोलु सैंदाणे,हरीओम भिलाणे, विनोद सैंदाणे,अरविंद बोरसे,ज्ञानेश्वर जाधव,जगन्नाथ बोरसे आणि समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते़.अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, संत गाडगे बाबा महाराष्ट्राचे थोर समाज सुधारक होते़ कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या एका हातात खराटा व दुसºया हातात मडके होते. समाज सुधारणा व स्वच्छता करण्यात त्यांना जास्त रुची होती.

प्राण्यांची हत्या करू नका,समाजात अस्पृश्यता पाळू नका,असा संदेश त्यांनी दिला.महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार म्हणाले,संत गाडगे महाराज हे गोरगरीब,दीनदलित यांच्यामधील अज्ञान,अंधश्रद्धा,अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका अशा संदेश देणारे या थोर महापुरुषाचा सर्वत्र महाराष्ट्रात झाला़
अनिकेत सुनिल येशीराव या विद्यार्थ्याने जपानी भाषेतील परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला़ याप्रसंगी धोबी समाजाच्या युवा शहराध्यक्षपदी हर्षवर्धन हेमंत बोरसे यांची निवड करण्यात आली़  सुत्रसंचालन सदाशिव ठाकरे,आभार प्रदर्शन सुनिल सुर्यवंशी यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध