Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
धुळे : अखेर पोलीस पाटलांसह ग्रामसेवकाचे निलंबन झाले ; शिवरायांचा पुतळा काढण्याचे जिल्हाधिकारीचे आदेश
धुळे : अखेर पोलीस पाटलांसह ग्रामसेवकाचे निलंबन झाले ; शिवरायांचा पुतळा काढण्याचे जिल्हाधिकारीचे आदेश
धुळे : दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता स्थापन केल्यावरून झालेल्या तनावामुळे धनुर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह पोलीस पाटलांचे जिल्हा प्रशासनातर्फे निलंबन करण्यात आले. शिवाय कलम १४४ लागू करीत दोन दिवसात पुतळा काढण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत
धुळे (Dhule) जिल्ह्यातील धनुर गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) अश्वारूढ पुतळा प्रशासनाची परवानगी न घेता उभारला होता. यामुळे पोलीस प्रशासनातर्फे धनूर ग्रामपंचायत प्रशासनाला पुतळा काढण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्यानंतर ग्रामस्थांनी विरोध करीत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कामात कसुरता केल्याचा ठपका
लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आठ दिवसांत याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे सांगत ग्रामस्थांची समजूत काढण्यात आली होती. परंतु अखेर जिल्हा प्रशासनातर्फे धनुर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह पोलीस पाटलांना या संदर्भातील सर्व माहिती असताना देखील प्रशासनापासून सदर माहिती लपवण्याच्या कारणावरून व कामात कसुरता केल्याबाबत संबंधित ग्रामसेवकासह (Gram Sevak) पोलिस पाटलाचे निलंबन करण्यात आले आहे.
गावात संचारबंदी
जिल्हा प्रशासनातर्फे कायद्याचे उल्लंघन करून नियमबाह्य पद्धतीने पुतळा बसविल्या कारणावरून ग्रामपंचायतीला दोन दिवसात पुतळा काढण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित घटना घडू नये यासाठी कलम 144 लागू करण्यात आला असून कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर वायरल न करण्याचे देखील आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा