Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का ? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? असा संतप्त प्रतिप्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार



मी,बाळासाहेब थोरात,दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का ? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? असा संतप्त प्रतिप्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत केला.शिवनेरी गडावर आयोजित करण्यात आलेल्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमातील सभेत अजित पवार बोलत होते.

त्यावेळी उपस्थित असलेल्या एकाने मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांना विचारणा केली.त्यावेळी अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.काही वेळानंतर त्या व्यक्तीने पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भाषणात अडथळा आणला . त्यानंतर अजित पवार चिंडले.तु कोणाची सुपारी घेऊन आलाय का असे व्यक्तीला अजित पवारांनी खडसावले.आज शिवजयंती आहे.

असे चालणार नाही.असे त्यांनी म्हटले . मी,बाळासाहेब थोरात,दिलीप वळसे पाटील आम्ही काहीं मराठ्यांच्या पोटचे नाहीत का ? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? पण शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय ? सर्वांना सोबत घेऊन जायलाच शिकवलंय ना ? इतर कुठल्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भुमिका असल्याचे त्यांनी सांगितले.मराठा सामाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची भुमिका आहे.मात्र,प्रश्न न्यायालयात अडकला आहे.

नियमात बदल करून आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारकडून नियमातच बदल करावा लागेल असेही अजित पवार यावेळी म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध