Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

आज धाडणे गावात 19 फेब्रुवारी शिव जन्मोत्सव वात्सल्य रूरल फाउंडेशन व कर्मवीर शंकरराव चिंधूजी बेडसें विद्यालय धाडणे तर्फे उत्साहात साजरा



आज दिनांक19 फेब्रुवारी 2022 रोजी कर्मवीर शंकरराव चिंधुजी बेडसे विद्यालय धाडणे येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली . याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासो. प्रमोद बेडसे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांनंतर दादासो श्री प्रमोद बेडसे यांनी " छत्रपती शिवाजी महाराज, एक धर्मसहिष्णु राजा" याबद्दल माहिती सांगितली.तसेच याप्रसंगी साक्री तालुका एज्यु. सोसायटी चे माजी विश्वस्त कै. आण्णासो.रामराव एम. भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच याप्रसंगी शिवजयंतीचे औचित्य साधून "वात्सल्य रूरल फाउंडेशन "धाडणे चे पदाधिकारी श्री चंदर अहिरराव ,विशाल अहिरराव,(पत्रकार)चंद्रशेखर अहिरराव,तुषार ढोले,भटू अहिरराव,विजय अहिरराव व सनी अहिरराव.नितीन मोहिते,चेतन अहिरराव शशिकांत अहिरराव, धीरज अहिरराव यांनी विद्यालयस भेट दिली.
त्यात वात्सल्य रूरल फौंडेशन ने करोना सारख्या महामारी मध्ये सरकारी नियमच पालन करून शिवजन्मोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करून त्याचा शालेय मुलां मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करण्यात आली.. विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप केले.यानंतर वासल्य फाउंडेशन चे श्री चंदर अहिरराव यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात अभ्यासाचे महत्त्व पटवून
करोना काळात गावातील मुलांना वर जो शैक्षणिक नुकसान झालं त्या विषयावर मार्गदर्शन करून भविष्यात विद्यार्थ्यां च्या शैक्षणिक जीवनात कस बदल होतील त्यावर चर्चा करून अनमोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.वात्सल्य फौंडेशन सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ व मुलां मुलींनी उपस्थित राहून यांनी मोलाचे सहकार्य केले..

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध