Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
राज्याच्या सागरी किनाऱ्यांवरील सुरक्षेसंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती
राज्याच्या सागरी किनाऱ्यांवरील सुरक्षेसंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती
राज्याची सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच सागरी सुरक्षा दलाचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
राज्याची सागरी सुरक्षा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सागरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या किनारपट्टीची सुरक्षितता अधिक भक्कम करण्यासाठी, सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील व महत्त्वाच्या प्रस्तावांना शासनस्तरावरून तात्काळ मान्यता देण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी यावेळी दिले.
राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना एकूण ७२० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. त्याच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय व्यवस्था कार्यरत असून त्याची माहिती गृहमंत्र्यांनी घेतली.
किनाऱ्यांच्या ठिकाणी अत्यावश्यक व आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याबरोबरच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना देत सागरी सुरक्षा दलातील तांत्रिक रिक्त पदे भरण्याकरता शासन मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.
महाराष्ट्र सागरी किनारपट्टीची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आणि सागरी सीमांचे संरक्षण करणाऱ्या सहा अत्याधुनिक बोटी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. याबाबत विहित मर्यादा निश्चित करण्यास गृहमंत्र्यांनी सांगितले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा