Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

प्रा.विनोद वाघ यांना पीएचडी पदवी प्रदान.

                           

नगांव एज्युकेशन सोसायटीच्या गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसी, नगांव येथील फार्मास्युटिक्स विभागाचे विभागप्रमुख प्रा. विनोद वाघ यांना सुरेश ग्यानविहार युनिव्हर्सिटी जयपुर तर्फे फार्मसीमध्ये पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.                              
प्रा. विनोद वाघ यांचा "सोल्युबीलिटी एनहांसमेंट ऑफ पूरली अक्विओस सोल्युबल ड्रग" हा शोधनिबंधाचा विषय होता. या करिता त्यांना प्रा.डॉ. आर. डी. वाघ सर व प्रा. डॉ. आर. एम. गिल्होत्रा यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी शोधप्राबंधावरील कामावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीन रिसर्च व एक रिव्ह्यू आर्टिकल व एक बुक चाप्टर प्रकाशित केले आहे. ते बाळापूर गावाचे मा. सरपंच सौ. शांताबाई तुकाराम वाघ व सेवानिवृत्त स्था. स. अ. श्री. तुकाराम सुपडू वाघ यांचे सुपुत्र आहेत. तसेच गरताड गावाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. दिलीप लक्ष्मण पाटील यांचे जावई आहेत.          

या यशाबद्दल नगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री.बाळासाहेब मनोहरजी भदाने,उपाध्यक्षा सौ.माईसाहेब ज्ञानज्योती भदाने,अध्यक्ष मा.रामदादा भदाने, प्राचार्य प्रा.डॉ.विशाल बडगुजर, उपप्राचार्य डॉ.सुफियान अहमद,प्रा.कुंदन देवरे,तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध