Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांची मोठी घोषणा; येत्या मार्चपर्यंत गरजूंसाठी ५ लाख घरे बांधणार..



महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्यांच्या घरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार येत्या ३१ मार्चपर्यंत राज्यात ५ लाख घरे बांधण्यात येणार आहेत. राज्य सरकार ही घरे महाआवास योजना २.० अभियानाअंतर्गत ही घरे बांधली जाणार आहे. ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांनी ही घोषणा केली आहे.
अनेक वर्षापासून बेघर आणि गरजू लोकांची यादी तयार करण्यात आलेली असतानाही त्यांना घरे काही मिळत नव्हती. या गरजू आणि बेघर लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी ही मोहीम आखण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील ५ लाख घरे बांधण्याचा संकल्प पूर्ण झाला असल्याचे मुश्रीफसाहेब म्हणाले.
मंत्रालयातील महाआवास अभियान २.० च्या बैठकीनंतर मुश्रीफसाहेब यांनी ही घोषणा केली. करोनाचे संकट असतानाही असतानाही महाआवास अभियानाचा पहिल्या टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे. अनेक वर्षापासून बेघर आणि गरजू लोकांची यादी तयार करण्यात आलेली असतानाही त्यांना घरे काही मिळत नव्हती. या गरजू आणि बेघर लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी ही मोहीम आखण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील ५ लाख घरे बांधण्याचा संकल्प पूर्ण झाला असल्याचे मुश्रीफसाहेब म्हणाले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध