Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
मराठी पत्रकार परिषदेच्या कुटुंब ॲपची संख्या दहा हजाराच्या पार* *पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा निर्धार
मराठी पत्रकार परिषदेच्या कुटुंब ॲपची संख्या दहा हजाराच्या पार* *पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा निर्धार
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई - पत्रकारांची शक्ती संघटीत व्हावी, एकमुखी आवाज व्यक्त व्हावा आणि राज्यकर्त्यांवर एक दबाव निर्माण व्हावा यासाठी मराठी पत्रकार परिषदेची कुटुंब ॲप ही व्यवस्था आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून पत्रकारांचे उर्वरित प्रश्न मार्गी लागण्यासाठी हे ‘अॅप’ उपयुक्त ठरत आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या कुटुंब ॲपवरील सदस्य संख्या दहा हजार पार झाली असून ‘दस हजारी’ हे कुटुंब पुढील काळात विस्तारत जाणार असून या माध्यमातून पत्रकारांचा आवाज बुलंद होत राहणार आहे असा विश्वास अ.भा. मराठी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केला.
एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे, ‘‘आपण कुटुंब अॅपवर आहोत म्हणजे मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य आहोत असे नाही. परिषदेचा सदस्य होण्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे. त्यासाठी आपण ज्या जिल्ह्यातून असाल त्या ठिकाणच्या अ.भा. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षांशी संपर्क साधावा. माध्यमाचं क्षेत्र प्रचंड विस्तारलं आहे. मिडीयात घडणाऱ्या बारिक-सारिक गोष्टींची माहिती सर्वांना कळतेच असं नाही. ती माहिती आणि मराठी पत्रकार परिषदेचे उपक्रम जास्तीत जास्त पत्रकारांपर्यत पोहोचावे असा या ‘अॅप’ मागचा उद्देश आहे. त्यामुळे या अॅपवर पत्रकारितेशी संबंधित विषयांवरच चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करीत एसेम देशमुख यांनी पुढे स्पष्ट केले की, ‘अॅप’वरील काही मित्र जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल अशा बातम्या सातत्यानं टाकत असतात हे अॅप त्यासाठी नाही. त्यांनी हे थांबविले नाही तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल. निष्क्रिय सदस्यांची संख्या देखील मोठी आहे. ज्यांना अॅप बघायलाही वेळ नाही. त्यांनी स्वतःहून अॅपबाहेर पडावे. शिवाय ज्यांचा पत्रकारितेशी संबंध नाही अशा लोकांचे देखील येथे काही काम नाही. असे स्पष्ट नमुद करीत कुटुंब ॲपला प्रतिसाद देणाऱ्या पत्रकारांचे अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी आभार मानले
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा