Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

विवाहसोहळा विशेष चर्चेत ! माझ्या डोळ्यांनी मी त्यांना जग दाखवेन !



शाहदा प्रतिनिधी: डोळस तरुणीने एका अंध तरुणाशी लगीनगाठ बांधून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे.तीन दृष्टिहीन भावाबहिणींपैकी दोघा भावांशी डोळस मुलींनी विवाह केल्याने हा विवाहसोहळा विशेष चर्चेत आला.नंदुरबार जिल्ह्याच्या वेशीला मध्यप्रदेश राज्यात पानसेमल तालुक्यातील मलफा टेम्बली येथे हा सोहळा पार पडला.नंदुरबार जिल्ह्याच्या वेशीला असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील पानसेमल तालुक्यात खेतीया गावापासून जवळच असलेल्या आदर्श गाव टेमली येथे शनिवारी एक अनोखा विवाहसोहळा पार पडला.एका दृष्टीहीन नसलेल्या मुलीने एका अंध मुलाशी लग्न केले. दोन्ही परिवारांच्या संमतीने हा विवाहसोहळा पार पडला.टेमली येथील रहिवासी सौ.किरण व आनंदा भीमराव मोहने यांना दोन मुले व एक मुलगी असे तीन अपत्ये आहेत.

तिनही दृष्टिहीन आहेत.या सर्वांचे पालन पोषण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे अशक्य काम मोहने परिवाराच्या नशिबी आले.मात्र दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना शासकीय नोकरी मिळवून देण्यात हे दाम्पत्य यशस्वी झाले.

या मुलांनी धुळे,मुंबई,पुणे,अमरावती अश्या विविध ठिकाणी असलेल्या दृष्टीहीनांसाठीच्या शाळांमधून आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शासनाच्या दिव्यांग कोट्यातून त्यांना नोकरी तर मिळाली पण आयुष्यभरासाठी सोबती म्हणून छोकरी समाज त्यांना देईल का? हा प्रश्न गंभीर होता.इथे कित्येक डोळस मुलांना लग्नाविनाच रहावे लागत असल्याची उदाहरणे समोर आहेत.मात्र, या दृष्टिहीन मुलांशी संसारगाठ बांधण्यासाठी मुली पुढे आल्या.शनिवारी पार पडलेल्या विवाह सोहळ्यानंतर वरखेडी ता.जि.धुळे येथील रहिवासी सौ.संगिता व ज्ञानेश्‍वर अर्जुन खळाले यांची कन्या असलेल्या वधू गायत्रीने सांगितले की,अंध असल्यामुळे काहीही होत नाही.

व्यक्तीचे हृदय शुद्ध असावे. प्रवीणशी बोलल्यानंतर तो आयुष्यभर आपल्यासोबत असेल असे वाटले.त्यामुळे मी घरच्यांना लग्नासाठी संमती दिली. लग्नानंतर आम्ही दोघे नेहमी आनंदी राहू. मी त्यांना आयुष्यभर साथ देईन,माझ्या डोळ्यांनी मी त्यांना जग दाखवेन,असेही ती म्हणाली.या विवाह सोहळ्यातील वर प्रवीण हा मध्य रेल्वेच्या खलाशी म्हणून कार्यरत या विवाह सोहळ्यातील वर प्रवीण हा मध्य रेल्वेच्या खलाशी म्हणून कार्यरत आहे.तर प्रवीणचा मोठा भाऊ सुरेश याचाही विवाह अमरावती येथे १० जानेवारी रोजी बैतूल येथील उर्मिला या सामान्य मुलीशी पार पडला.सुरेश शहादा येथे आयडीबीआय बँकेत लिपिक म्हणून कार्यरत आहे.

त्यांना एक दृष्टिहीन बहीण आहे,ती शिक्षण घेत आहे.शनिवारी पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला मोहने कुटुंबियांच्या आप्तेष्टांसह समाजातील विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.आपल्या दृष्टिहीन मित्राच्या या आनंद सोहळ्यात त्याचे अनेक दृष्टिहीन मित्रदेखील बँडच्या तालावर थिरकत सहभागी झाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध