Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

दहिवद ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेत दहिवद गावात मोफत कापडी पिशव्यांचे वाटप



अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेत गावात मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले, उपसरपंच,सदस्य यांच्या हस्ते गावातील किराणा दुकानदार,घाऊक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. गाव व गावाचा परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.

माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येत आहे.यावेळी लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले,
उपसरपंच बाळासाहेब पाटील,सदस्या रेखा पाटील, शिवाजी पारधी,योगिता गोसावी, देवानंद बेहरे तसेच गुलाब पाटील,संजय पाटील,जयश्री पाटील,भय्या पुजारी,
अंगणवाडी सेविका रंजना पाटील,अरुणा माळी, लता पाटील,विद्या पाटील,निर्मला जाधव,रवी पाटील, राजू पारधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध