Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० दिवसानंतर मंगळवारी, १५ फेब्रुवारीपासून शेतीमालाची खरेदी विक्री सुरू शेतकऱ्यांनी शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस आणण्याचे आवाहन सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० दिवसानंतर मंगळवारी, १५ फेब्रुवारीपासून शेतीमालाची खरेदी विक्री सुरू शेतकऱ्यांनी शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस आणण्याचे आवाहन सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया
शिरपूर प्रतिनिधी :कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० दिवसानंतर मंगळवारी, १५ फेब्रुवारीपासून शेतीमालाची खरेदी विक्री सुरू झंली आहे. शेतकऱ्यांनी शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस आणण्याचे आवाहन सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया यांनी केले आहे.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती इशेंद्र कोळी, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष के. आर. अग्रवाल, संचालक युवराज जैन, मोहन पाटील, जितेंद्र राजपूत, गोटू शेठ, पप्पू शेठ तसेच हमाल मापाडी संघटनेचे शिवाजी वाळुंजकर रोहिदास मुकादम, पांडुरंग मुकादम, प्रकाश रुखमे, बाजार समितीचे संचालक अविनाश पाटील, नरेश पाटील, हिरालाल पावरा आदी उपस्थित होते.
शिरपूर बाजार समितीत गेल्या एक महिन्यापासून व्यापारी हमाली दराच्या वाढीव मागणीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी शेतीमाल खरेदी विक्री व्यवहार बंद केला होता. व्यापारी हमालीची दरवाढ दर तीन वर्षांनी होत असते.ती मुदत ३१ जानेवारी रोजी संपली होती. या काळात हमालांनी व्यापारी हमाली दरवाढीची जास्तच मागणी केल्याने १७ जानेवारीपासून व्यापारी असोसिएशने शेतीमाल खरेदी विक्री बंद केली होती.या दरम्यान बाजार समितीच्या संचालक मंडळ व सभापतींनी व्यापारी आणि हमाल असोसिएशन यांच्यात तडजोडीकरीता तीन वेळा बैठक घेतली. त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाढीबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे १७ जानेवारी २०२२ पासून शेतीमाल खरेदी विक्रीचा व्यवहार ठप्प झाला होता.
व्यापारी हमाली १३.५ टक्क्यांवर तोडगा निघाला " तालुक्यातील शेतकरी शेतीमालाची खरेदी विक्री बंद झाल्याने अडचणीत आले होते.अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाजार समितीचे संचालक मंडळ सक्रिय होत व्यापारी व हमालांच्या वादावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले.परवाने निलंबित करण्याच्या नोटीसा बजावत बाजार समिती लवकर सुरू करण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार सोमवारी दुपारी व्यापारी असोसिएशन, हमाल व्यापारी असोसिएशन यांच्यासोबत बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाने बैठक घेतली. बैठकीत व्यापारी हमाली १३.५ टक्क्यांवर तोडगा निघाला.त्यामुळे मंगळवारपासून शेतीमालाची खरेदी विक्री करण्यास व्यापाऱ्यांनी सहमती दिली आहे.मंगळवारी सकाळपासून शेती मालाची खरेदी विक्री होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजार समितीत आणावा,असे आवाहन केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा