Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
दोंडाईचा शहरात बॅकांचे ग्राहक सेवा केंद्र ग्राहकांच्या सेवेसाठी कि, स्वताःच्या मेवा खाण्या साठी ?
दोंडाईचा शहरात बॅकांचे ग्राहक सेवा केंद्र ग्राहकांच्या सेवेसाठी कि, स्वताःच्या मेवा खाण्या साठी ?
दोंडाईचा शहरात राष्ट्रीयकृत बॅकां अनेक आहेत या बॅंकांचे ग्राहक,ठेवीदार,कर्जदार मोठ्या प्रमाणात आहेत गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून बॅकांच्या ईमारती पुर्वीच्या जुन्या आहेत राष्ट्रीयकृत बॅंकांचे कर्मचारी कपात धोरणामुळे नोकर भरती होत नाही खातेदारांची रक्कम सुरक्षित बॅकेत राहिल अशी खात्री असल्याने पैशाची देवान- घेवाण व्यवहार बॅंकेच्या माध्यमातून करतात त्यामुळे ग्राहकांची गर्दी बॅकेत जास्त होते बॅकांची गर्दी आणि लोड कमी करण्यासाठी काही बॅकांनी मान्यताप्राप्त ग्राहक सेवा केंद्र सुरू केले
आहेत तर काहींनी अनधिकृत ग्राहक सेवा केंद्र सुरू करून घेतले या ग्राहक सेवा केंद्रामध्ये ऑनलाईन बॅक खाते खोलणे मनीट्रस्पर (पैसे पाठवणे) पैसे काढुन देणे अर्थात बॅकेत जसा व्यवहार केला जातो तसाच व्यवहार कमिशन घेऊन केला जातो परंतु ग्राहक सेवा केंद्र चालकाने ग्राहकांची सेवा कमी केली आणि स्वताची सेवा जास्त केली ग्राहक सेवा केंद्रामध्ये कमी शिकलेले अनाडी लोकांचा अज्ञान पणाचा फायदा घेत या ग्राहक सेवा केंद्राच्या चालकानी चार ते पाच लाखाचा चुना लावला आहे
उत्तर प्रदेश,बिहार या राज्यातु मजुर, व्यवसाय करण्यासाठी कारागीर शहरात रातात त्यांना त्यांच्या कुटुंबाला पर राज्यात पैसे पाठवायचे असतात बॅकेत गर्दी असल्याने ते ग्राहक सेवा केंद्राकडे जाऊन पैसे जमा करतात परंतु ते पैसे दहा-- पधारा दिवस पाठवले जात नाही स्वता वापर करून घेतात आणि ग्राहकांना खोटं बोलुन फिरवतात नेट बंद आहे सर्वळ चालत नाही उद्या पाठवतो परवा या असे उत्तरे देतात यामध्ये अनेकांची फसवणूक झाली आहे काहीचे तर पैसेच दिले नाही ग्राहक सेवा केंद्राचे चालक खुप चालाख असतांत त्यांनी सेवा केंद्रावर रोजनदारीने महिला व मुलींना कामाला ठेवले आहे त्यामुळे ग्राहकांना जास्त बोलता येत नाही अशा बॅकांचे ग्राहक सेवा केंद्र ग्राहकांना सेवा देण्यासाठी होते का ? स्वता मेवा खाण्यासाठी आहेत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा