Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

यावर्षी कांदा लागवडीमध्ये वाढ, निर्यातीस प्रोत्साहन देण्याची कांदा उत्पादक संघटनेची मागणी....



यावर्षी रब्बी हंगामात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कांदा लागवडीमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीस प्रोत्साहन देऊन कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी *महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक/ अध्यक्ष भारत दिघोळे* यांनी केली आहे. तसेच कांदा निर्याती संबंधित धोरण आखण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. यावर्षी धरणांच्या तसेच भूगर्भात झालेल्या मुबलक पाणी साठ्यामुळे कांदा लागवडी खालील क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी विक्रमी कांदा उत्पादन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्व साधारणपणे मार्च महिन्यापासून बाजारात मोठया प्रमाणात कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा निपटारा योग्य वेळेत होण्यासाठी मोठया प्रमाणावर कांदा निर्यात होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारने ठोस निर्णय घेऊन कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण आखणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी महाराष्ट्रतील सर्व पक्षीय खासदारांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे शेतकरी वर्ग मोठया आर्थीक संकटात सापडला आहे. वेळोवेळी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडला गेला आहे. पेट्रोल- डिझेलचे वाढलेले भाव, रासायनिक खते व औषधांच्या किंमतीत भरमसाठ झालेली भाववाढ, शेतमजूरीत झालेली वाढ यामुळे दिवसेंदिवस उत्पादन खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे
तरी याबाबत केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांची सहनशीलता.न पाहता तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी  संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांची मागणी संजय भदाणे.धुळे. जिल्हा अध्यक्ष

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध