Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २२ मार्च, २०२२



प्रतिनिधी :कृष्णा अरुण महाजन,एरंडोल 

छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोरगरीबांच्या मदतीला नेहमी धावून जाणारे आरोग्य दूत विक्की भाऊ खोकरे यांच्या तर्फे प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोफत ई-श्रमिक कार्ड व प्रत्येकी दोन लाखाचा विमा करून देत गोरगरीब व मोल मजुरी करणाऱ्या नागरिकांची नोंदणी शासनाकडे करण्यासाठी मोफत शिबीर आयोजित करण्यात आले. 

त्याचे उदघाटन बाजार समितीचे माजी सभापती शालिक भाऊ गायकवाड यांचा हस्ते करण्यात आले त्यावेळी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य आनंदा चौधरी (भगत)अरुण पवार,आकाश गायकवाड, संघरत्न गायकवाड,सुनिल भाऊ मराठे, हर्षल भाऊ नारखेडे, अश्विनी नारखेडे,देवेद्र चौधरी,महेंद्र.आमिन मुजावर यांचा सह अनेक नागरिक व महिला उपस्थित होते 
या शिबिरात नागरिकाचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून प्रत्येकाने या शिबिर व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन विक्की खोकरे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध