Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २२ मार्च, २०२२

वाघाडी येथे मनसे तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे यांच्या कडून शिवजयंती निमीत्ताने किर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन




शिरपूर प्रतिनिधी: महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक अध्यक्ष श्रीमान राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरा करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे शिरपूर मनसे तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे यांच्या अथक परिश्रमातून तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या भरगोस प्रतिसादामुळे व त्यांच्या इच्छेनुसार वाघाडी येथे शिवजयंती उत्सव पुनमचंद मोरे यांनी मोठ्या थाटा माटात साजरी केली.   


यापुढे शिवजयंती तिथी प्रमाणे साजरा झाली पाहिजे असे सर्व महाराष्ट्र मराठी जनतेला व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना श्रीमान राज साहेब ठाकरे यांनी सुचविले होते. शिरपूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी व शिवप्रेमींनी आपल्या घरावर भगवा झेंडा लावून रात्री घराच्या बाहेर शिव दीपोत्सव साजरा केला. तर वाघाडी येथे ग्रामीण जनतेच्या मनाचा वेद घेत, शिवाजी महाराजाची महिती किर्तनातून त्यांच्या मनात उतरविण्यासाठी शिरपूर मनसे तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे यांनी ह.भ.प. ज्ञानेश्वर भदाणे महाराज यांच्या किर्तनाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता.


या कार्यक्रमाच्या सुरुवातीस  शिवाजी महाराजाच्या प्रतिमेचे पूजन वाघाडी सरपंच उज्वलाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. दीप प्रज्वलन मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, शहराध्यक्ष चेतन राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला. या  कार्यक्रमासाठी मनसेचे निरीक्षक राज्य उपाध्यक्ष विनय जी भोईटे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सदर कार्यक्रमास वाघाडी गावाचे सरपंच उज्वलाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य शांतीलाल पाटील, मनसे जिल्हा अध्यक्ष राकेश चौधरी, शहराध्यक्ष चेतन राजपूत,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष सोनू राजपूत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उदयन राजे पाटील, हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. तर विकी मोरे,जितेंद्र पाटील,मयूर कोळी, गणेश मोरे,ज्ञानेश्वर कोळी,प्रशांत मोरे, अजय सोनवणे,जितेंद्र कोळी,अमोल गुजर,राकेश गुजर इत्यादी स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे नियोजक व आयोजक मनसे तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी केली असून सुत्र संचालन यशवंत निकवाडे सर यांनी केले. वाघाडी ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी पुनमचंद मोरे यांना यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडल्याने त्यांचे कौतुक केले आहे.कार्यक्रमास उपस्थित मनसे पदाधिकारी विलास परदेशी, चेतन पाटील, रमेश अहिरे, राकेश चौधरी, रतिलाल परदेशी, मनोज पाटील, अजय सोनवणे, भटू पाटील, सागर पाटील, प्रशांत तिरमले, राकेश गुजर, अमोल गुजर, व अधिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाला अनमोल सहकार्य म्हणून श्रीराम भजनी मंडळ वाघाडी यांचे सहकार्य लाभले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध