Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ७ मार्च, २०२२
मा भगत सिंग कोशारी संविधानिक पदाची गरिमा बाळगा :- डॉ.राजन माकणीकर
मुंबई दि (प्रतिनिधी) राज्याचे राज्यपाल मा.भगतसिंग कोशारी हे औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात "साठी बुद्धी नाठी" असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे,ते गुरुच्या बाबतीत बोलताना म्हणाले की, "समर्थ के बिना शिवाजी को कोण पहचानेगा?"असे म्हणून द्रोह तर केलाच आहे परंतु संविधानिक पदाची गरिमा राखली नसून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ.राजन माकणीकर यांनी सोसिएल मीडिया द्वारे केली आहे.
डॉ.माकणीकर पुढे म्हणाले की,
राज्यपालांची नियुक्ती भारतीय संविधान भाग-६ राज्य अनूच्छेद १५५ नुसार झाली आहे,अनुच्छेद १५९ नुसार राज्यपाल पदाच्या शपथेवर संविधान कायदा व सुव्यवस्था यांची जबाबदारी घेतली आहे. मात्र: वारंवार बहुजन राष्ट्र महानायकांवर ते वादग्रस्त बोलून कायदा सुव्यवस्था बीघडवू पाहत आहेत.राष्ट्रपिता ज्योतिबा व राष्ट्रमाता सावित्री आई यांच्या वैवाहिक जीवनावर पण असभ्य भाष्य करून टिंगल केली आहे,
हे फार निंदनीय असून राज्यपाल हे पद संविधानिक असतांनाही असंविधानीक वक्तवे करतात त्यामुळे त्यांच्या वृत्तीचा रिपाई डेमोक्रॅटिक तीव्र निषेध व्यक्त करत असून त्यांच्या राजीनाम्याची मागनी करत आहे.वेळीच माफी मागावी आणि वागण्यात सुधारणा नाही केली तर दिसेल तिथे तोंडाला काळ फासू असा इशाराही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा