Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ मार्च, २०२२

साक्री नगरपंचायत स्वीकृत नगरसेवक पदी भाजपकडून ऍड पुनम काकुस्ते-शिंदे तर शिवसेनेकडून मुकेश शिंदे यांची निवड..!



साक्री प्रतिनिधी: साक्री नगरपंचायत स्वीकृत नगरसेवक पदी भाजपकडून ऍड पुनम काकुस्ते-शिंदे तर शिवसेनेकडून मुकेश शिंदे यांची निवड करण्यात आली . यावेळी पीठासन अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे , मुख्याधिकारी देवेन्द्रसिंह परदेशी हे उपस्थित होते.

याचबरोबर विषय समितीच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया ही संपन्न झाली . निवड झालेल्या सदस्य तसेच सभापती यांचा सत्कार करण्यात आला.साक्री नगरपंचायत विषय समितीच्या सभापती तसेच स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया सोमवारी दि 7 रोजी नगरपंचायत कार्यालयातील सभागृहात पार पडली . यासाठी विशेष सभा घेण्यात आली . स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपाकडून अँड.पूनम जगदीश शिंदे तर शिवसेनेकडून मुकेश दशरथ शिंदे यांचे प्रत्येकी १ नामांकन पत्र दाखल करण्यात आले होते . त्यानुसार पीठासीन अधिकारी तृप्ती गोडसे यांनी स्विकृत नगरसेवक पदी ऍड पूनम शिंदे व मुकेश शिंदे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

विशेष सभेसाठी नगराध्यक्ष जयश्री पवार , उपनगराध्यक्ष बापुसाहे गिते,अँड.गजेंद्र भोसले,दिपक वाघ,संगिता भावसार , उज्ज्वला भोसले,उषाबाई पवार,प्रविण निकुंभे,सुमित नागरे,पंकज अहिरराव , राहुल भोसले,कल्पना खैरनार,नरगिस बी पठाण उपस्थित होते.यावेळी कार्यालयीन अधिक्षक सुनील चौधरी यांनी कामकाज पाहिले.तर जुबेर शहा,दिपक पाटील यांनी सहकार्य केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध