Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ मार्च, २०२२

धुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री धूलिवंदनाच्या दिवशी बंद



धुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री धूलिवंदनाच्या दिवशी ( शुक्रवार १८ मार्च ) रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.

बंदच्या दिवशी दुकाने उघडी आढळल्यास त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे . 

यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले आहे .

1 टिप्पणी:

  1. सर रायगड जिल्ह्यातील सुद्धा मध्यविक्री करणारे दुकान होळी,14एप्रिल या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्व दुकाने बंद करण्याबाबत प्रयत्न करावे

    उत्तर द्याहटवा

प्रसिद्ध