Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २ मार्च, २०२२

दिनांक २/०३/२०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर तालुक्याच्या वतीने मा.श्री तहसीलदार यांना निवेदन



शिरपूर प्रतिनिधी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व प्रदेश उपाध्यक्ष विनयजी भोईटे साहेब व धुळे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाने मा.श्री तहसीलदार आबा महाजन साहेब यांना निवेदन देण्यात आले कोरोना महामारीच्या काळात शासनाने शाळांमध्ये पोषण आहार देणे बंद केलेले होते.आता काही महिन्यांपासून सर्व शाळा सुरळीतपणे सुरु झालेल्या आहेत.त्या अनुषंगाने ज्या पध्दतीत शाळा सुरु झालेल्या आहेत,त्या पध्दतीने मुलांना शाळेत मध्यांन भोजन योजने अंतर्गत शालेय पोषण आहार मिळणे गरजेचे आहे.


आपला तालुक्यातील बरचशा भाग हा अदिवासी वस्त्यांच्या असून त्यांचे पालक हे हातमजुरी व मोलमजुरी करुन कसातरी आपला उदरनिर्वाह करित आहे.त्यांना त्यासाठी भल्यापाहटेच उठून कामावर जायचे असते.त्यामुळे अश्या परिवारातील मुलांची उपासमारी होत असते.व अश्या उपाश्यापोटी या मुलांचे शिक्षकांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष होत असते.व याच कारणामुळे शासनाने ही योजना सुरु केलेली आहे.तरी या योजनेचे व शिक्षणाचे महत्व लक्षात घेवून ही योजना पुर्वीप्रमाणे पुर्ववत सुरु होणे आज काळाची गरज  आहे  

तरी याबाबत आपणाकडून प्रशासनास यांची दखल घेणेकामी निवेदनाची प्रत आपल्यामार्फ़त वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात यावे.शासनाने याकडे असेच दुर्लक्ष केले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून थाळी बजाव अंदोलन छेडण्यात येईल.याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी.ही नम्र विनंती. 

यावेळी उपस्थित मनसे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे,मनसे शहराध्यक्ष चेतन राजपूत,तालुका उपाध्यक्ष अजय सोनवणे,शहर उपाध्यक्ष मेहमुद तेली, तालुका उपाध्यक्ष राकेश गुजर,तालुका सहसचिव अमोल गुजर,शहर विभाग अध्यक्ष विठ्ठल पवार,शहर विभाग अध्यक्ष राकेश चौधरी,शरतिलाल परदेशी,व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

प्रत उचित कार्यवाहीस्तव सविनय सादर

१ ) मा.शिक्षण मंत्री,महाराष्ट्र राज्य मुंबई  २) म.शिक्षणाधिकारी सो,जि.प.धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध