Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ मार्च, २०२२

धुळे मोहाडी पोलिसांच्या जाळ्यात मध्यप्रदेश चा व्यापारी अडीच किलो गांजा, गावठी पिस्तलसह, रामपुरी जप्त



धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर लळींग टोलनाक्यानजीक मोहाडी पोलिसांनी धाडसी कारवाई करत मध्यप्रदेशच्या व्यापाऱ्यासह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांचा एक साथीदार मात्र फरार झाला आहे. पोलिसांनी अडीज किलो गांजा, गावठी पिस्तल काडतुसे आणि रामपुरी चाकूसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

मोहाडी पोलिसांचे पथक रात्री गस्तीवर असताना मुंबई-आग्रा महामार्गावर लळींग टोलनाक्याजवळ हॉटेल दरियासमोर उभ्या असलेल्या एम.एच .१६ / ७१५१ क्रमांकाच्या उघड्या जीपबाबत त्यांना संशय आला.मोहाडी पोलिसांचे पथक ट्रकजवळ पोहचले.त्यांनी ट्रक चालक-मालक नदीम मोहम्मद शमीन सिद्दीकी (वय ३२,रा. नवी मुंबई) आणि असलम खान, अलीयारखान पठाण (वय ४०, रा.प्रितमपुर चौपाटी, मध्यप्रदेश) या व्यापाऱ्यांची चौकशी सुरु केली. 

दोघांकडे असलेल्या पिवळ्या पिशवीची तपासणी केली असता, त्या पिशवीमध्ये आणखी एक पांढरी पिशवी होती. त्यावर इंडियन बकेट असे इंग्रजीत लिहिले होते. पिवशी उघडून पाहिली असता,त्यात २ किलो ५०० ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच, दुसऱ्या पिशवीत पंधरा हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तल जीवंत काडतुसे आढळून आली.रामपुरी चाकूही आढळून आला. पोलिसांनी जीपसह ३ लाख ८२ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. रात्री ८ वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. 

गांजाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पोलिसी कारवाई करत, रात्री १ वाजेच्या सुमारास नदीम मोहम्मद आणि असलम खान या दोघांना अटक करण्यात आली. मोहाडी पोलिसांच्या कारवाईची माहिती कळताच घटनास्थळी डीवायएसपी दिनकर पिंगळे, पीआय डी.एस.शिंदे हे दाखल झाले होते. आरोपी विरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीआय दत्तात्रय शिंदे करीत आहेत.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध