Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ मार्च, २०२२

एका सामान्य महिलेने एका तत्कालीन तहसिलदारवर भ्रष्टाचाराची कारवाई सत्य मार्गाने थेट मंत्रालयातुन विजय मिळविला ....



मुंबई | थेट मुंबई मंत्रालयातून...
पैठण चे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या वर तात्काळ कार्यवाही करण्यासंदर्भात महसूल विभागाचे ने पत्र पाठवीले आहे .
सामान्य जनतेच्या जीवावर पैठण चे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जी बेहिशोबी मालमत्ता जमवली ,सरकारी कामात जो भ्रष्टाचार केला त्याचा विरोधात महाराष्ट्रच्या पैठणची सामाजिक कार्यकर्ता अनिता नितीन वानखेडे गेले ४ महिन्यापासुन आवाज उठवत होते आज त्यांच्या त्या रास्त मागणीला कुठे तरी न्याय मिळताना दिसत आहे..
पैठण चे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या वर येत्या 15 दिवसाच्या आत सखोल चौकशी करून माहिती आवश्यक कागदपत्रांचा अहवाल शासनाला सादर करून देण्यासासंदर्भात आज  अनीता वानखेड़े ह्यांच्या समक्ष   महसूल विभाग मुंबई येथून पत्र काढण्यात आले .व  त्याची एक प्रत  अनिता  वानखेडेनां  देण्यात आली.
आजगायत जो भ्रष्टाचार तहसीदार चंद्रकांत शेलकेनि केला तो सर्व उघड होणार  असे म्हणत अनीता वानखेड़े ने 
महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात ह्यांचे मानापासून अभिनंदन तर केलेच ,पन त्या बरोबर हया विजया संधर्भात सामाजिक कार्यकर्ता अनीता नितिन वानखेड़े चे सगल्या स्तरातुन ही अभनिनंदन होत आहे .

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध