Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ मार्च, २०२२

हरियाणाकडुन तामिळनाडूकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक खड्डयात



शिरपूर प्रतिनिधी:हरियाणाकडुन तामिळनाडूकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक खड्डयात जावून उलटल्याची घटना पळासनेर फाट्यावर घडली.या अपघातात चालक व सहचालक जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी शिरपुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी शिरपुर तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे . शिरपुर तालुक्यातील मुंबई - आग्रा महामार्गावरील पळासनेर फाट्यावर दि.५ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने हरियाणाकडुन तामिळनाडूकडे जाणारा मालट्रक ( टीएन ५२ / एए -५२७ ९ ) वरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक खड्डयात जाऊन उलटला.या अपघातात चालक कन्ना वेडू देवेंद्र ( ४६ ) रा. प्रभादेवी मुंबई,सह चालक चिला दुराई मोकाई मुलुंड ( ३२ ) पेरीयाकलम जि. धेनी,तामिळनाडू हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शिरपुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . त्यात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याप्रकरणी डॉ .पी.एस.पाटील यांच्या माहितीवरुन शिरपुर तालुका पोलिस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे.तपास पोना संजय धनगर करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध