Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ मार्च, २०२२

सोमवारी बुडापेस्टमधून सर्व विद्यार्थ्यांना मायदेशात आणले परत



मागील 12 दिवसांपासून रशिया - युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे.रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत.भारत सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधील विविध भागातून भारतीयांना मायदेशी आणले आहे.

सोमवारी बुडापेस्टमधून सर्व विद्यार्थ्यांना मायदेशात आणले आहे.केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी या विमानासोबत आले आहेत बुडापेस्टमधून केंद्रीय मंत्री सहा हजार 711 विद्यार्थ्यांना घेऊन मायदेशात परतले आहेत.केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.हे तरुण लवकरच आपल्या घरी पोहचलीत लवकरच सर्वजण आपल्या आईवडिलांसोबत आणि कुटुंबासोबत असतील.मागील आठवडाभरापासून ऑपरेशन गंगा अंतर्गत 16 हजार पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून मायदेशात आणले आहे.खारकीव्ह,सुमी येथून सर्वांना मायदेश आणण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध