Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस स्टेशनच्या बाहेर असलेल्या गोदामाला आग. लाखोंचा मुद्देमालाची राख .जळून खाक झालेल्या वाहनांच्या नुकसान भरपाई कोण व कशी देणार जनतेचा करडा सवाल ?



शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस स्टेशनच्या बाहेर असलेल्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना आज घडली आहे.या आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही. यात पोलीसांनी कारवाईत जप्त केलेला संपूर्ण मुद्देमाल जळून खाक झालेले आहेत.अग्निशमनचे दोन बंब घटनास्थळी दाखल होत आग विझविण्याचा प्रतत्न करीत आहेत.


सविस्तर वृत्त – आमच्या प्रतीनिधीस मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 3 वरील शिरपूर तालुक्यातील व महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेलगत असलेले अत्यंत महत्वाचे सांगवी पोलीस स्टेशन येते.अश्या ठिकाणी बहेरच्या राज्यातून गैरमार्गाने वहातूक होणा-या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात येऊन ते जप्त करण्यात येऊन तो मुद्देमाल येथिल पोलीस स्टेशन बाहेर असलेल्या गोदामात ठेवण्यात येतो.


आज दि 18 मार्च रोजी दुपारच्या सुमारास अचानक याच गोदामाला भीषण आग लागली आहे. पोलीसांनी कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल या गोदामा मध्ये ठेवण्यात येत असतो.हा संपूर्ण मुद्देमाल जळून खाक झाला आहे. पोलीसांनी अनेक वेगवेगळ्या कारवाई मध्ये जप्त करण्यात आलेले यात 10-12 मोटारसाईकली, एक मालवाहू अशोक लेलंड दोस्त पिकअप वहान,जप्त केलेला गांजा, गुटखा, दारुचे बॉस व स्पिरीटचे मोठे ड्रम जळून खाक झालेले आहेत.या आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.यात लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.शिरपूर येथील दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यात येत आहे.


यात जप्त केलेल्या मुद्देमालातील वहानधारकांच्या वहानांचे झालेल्या नुकसानीची जबाबदारी कशी निश्चित करणार व भरपाई नेमकी कोण व कशी देणार याबाबत परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेचे उधाण आलेले दिसून आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध