Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ मार्च, २०२२

धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात धुलीवंदनात डीजेचा आवाजावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी,सात ते आठ जण गंभर जखमी



धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात धुळवड साजरी होत होती.रंगांची उधळण करीत तरुण मंडळींनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता.मात्र साक्री शहरातील मध्यवर्ती कॉलनीत तरुण डीजे तालावर नाचत असतानाच दुसऱ्या गटाने येऊन डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितले. यावरुन दोन गटात शाब्दिक बाचाबाची  

सविस्तरवृत्त सर्वत्र आज धुळवडीचा सण साजरा करण्यात आला.सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना धुळवडीच्या या आनंदी सनाला गालबोट लागले आहे.धुलीवंदन निमित्त डीजे लावून नाचत असताना डीजेच्या आवाजावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना साक्री शहरातील मध्यवर्ती कॉलनी परिसरात घडली आहे.

या हाणामारीत सात ते आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या दिलेल्या माहितीनुसार सात ते आठ जण या प्रकरणात गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. जखमींमध्ये महिलांचा समावेश आहे.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध