Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माझ्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,खा.सुभाष देसाई,दिवाकर रावते,आदी उपस्थित होते
शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माझ्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,खा.सुभाष देसाई,दिवाकर रावते,आदी उपस्थित होते
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना मराठी माणसांसाठीच केली आहे. आता राज्यात सर्व पाट्या मराठी भाषेतून लावण्याची सक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. येत्या अधिवेशनात कायदा केला जाईल, महाराष्ट्रातील गावागावात मराठी भाषा, पाट्या प्रामुख्याने झळकतील.
स्थानीय लोकाधिकार समिती यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. आपण मराठीचा हट्ट धरला पाहिजे. मराठीचा मान सन्मान राज्यात राखला पाहीजे. त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात काम समितीने केले पाहीजे. तरच मराठीची उन्नती होईल.
चर्नी रोड येथे मराठी भाषा भवन तयार होत आहे. काही दिवसांत भूमिपूजनही होईल. आपल्याला, तमाम मराठी प्रेमींना अभिमान वाटेल, असे भव्य मराठी भाषा भवन उभारले जाणार आहे. मराठी किती श्रेष्ठ आहे, याचे दर्शन मराठी भाषा भवनामध्ये होईल.
मराठीच्या संवर्धनासाठी परदेशातील अनेक मराठी मंडळी जोमाने काम करतात. दुबईत ४१ मराठी मंडळांनी सादरीकरण केले. असे कार्यक्रम महाराष्ट्रात व्हावेत, मराठी भाषा भवनमध्ये जगभरातील मराठी मंडळीशी जोडले जावू, त्यासाठी व्हर्चुअल क्लासरूम सुरू करणार आहोत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मुलांना आपण देणार आहोत.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी माध्यमांनी आग्रह धरला आहे. परंतु अद्याप अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नाही.
केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण कधी घोषणा करणार? सर्व पुरावे देऊन झाले, तरीही घोषणा होत नाही. महाराष्ट्राला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो, हा इतिहास आहे. तशी वेळ आल्यास महाराष्ट्र गप्प बसणार नाही. महाराष्ट्र आत्ता शेवटी हात जोडून विनंती करतो. परंतु हात सोडायला वेळ लागणार नाही.
मुंबईचे मराठी हित राखण्यासाठी मराठी माणसांनी जे प्रयत्न केले, त्याला तोड नाही. या पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांची अशीच साथ असू द्या.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा