Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ मार्च, २०२२

भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त लोकजनशक्ती पार्टी च्या वतीने विनम्र अभिवादन..!




धुळे - आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान वीर एकलव्य यांच्या जयंती निमित्त शहरातील फाशीपूल चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.भगवान वीर एकलव्य यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लोकजनशक्ती पार्टी च्या वतीने यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच लोकजनशक्ती पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान केल आहे.

तसेच शहरातील राजू गांधी नगर, खंडलाई नेर, गावात साजरी होणाऱ्या भगवान विर एकलव्य यांच्या जयंती मध्ये  लोकजनशक्ती पार्टी चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे यांनी सहभाग नोंदवून आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत आनंदोत्सव साजरा केला आहे.

यावेळी विविध ठिकाणी विर एकलव्य यांचे स्मारक व प्रतिमेचे पूजन करून लोकजनशक्ती पार्टी च्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले..

याप्रसंगी लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे, महिला अध्यक्षा शोभाताई चव्हाण, महासचिव कुंदन खरात, आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते राजू साळवे, मधुकर शिरसाठ, सागर चव्हाण, गौतम वाघ, प्रमोद सोनवणे, आदी यावेळी उपस्थित होते.

या प्रसंगी महापौर प्रदीप कर्पे,तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,अशोक धुळकर, शंकर जाधव, अजय पवार,महेंद्र माळी,किशोर जाधव, रवी बोरसे,किसन ठाकरे,अशोक गवळी, राजेंद्र धुळकर,राजू अहिरे,राहुल धूलकर, राजेश चव्हान यांच्या सह समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध